टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Mask) हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. तसेच त्यांच्या नवनवीन आयडियांसाठी ओळखले जाते. ते सोशल मीडियावरही बरेच ॲक्टिव्ह असतात आणि लोकांपर्यंत अनेक गोष्टी पोहोचवत असतात. आज त्यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या पाळीव प्राण्याचा हटके वाढदिवस साजरा केला आहे आणि त्याचा एक फोटो एक्स (ट्विटर)वर पोस्ट केला आहे.

एलॉन मस्क यांनी त्यांच्या श्वान या पाळीव प्राण्याचे नाव मार्विन असे ठेवले आहे. मार्विनचा १ नोव्हेंबर म्हणजे काल वाढदिवस होता. त्यांनी आपल्या पाळीव प्राण्याचा वाढदिवस अगदीच खास पद्धतीने साजरा केला. त्याच्यासमोर निळा-पांढऱ्या रंगाच्या अनेक मेणबत्या लावून प्लेटमध्ये केक ठेवला. तसेच मर्विनच्या डोक्यावर हॅप्पी बर्थडे (Happy Birthday) असे इंग्रजी अक्षरांत लिहिलेला छान हेअरबँड लावला आहे आणि एक खास आकर्षक खेळण्यातील गाडी त्याच्यासमोर ठेवली आहे. एलॉन मस्क यांनी शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

हेही वाचा… छोले-भटुरे हातात घेऊन लिफ्टमध्ये अडकल्या तीन व्यक्ती! मदतीसाठी आले रहिवासी अन्… मजेशीर Video व्हायरल

पोस्ट नक्की बघा :

मार्विनचा वाढदिवस केला खास :

समोर केक, गाडी तर डोक्यावर खास हेअरबँड लावून मार्विनसुद्धा केककडे बघताना दिसत आहे. तसेच वाढदिवसाच्या या सुंदर क्षणाचा खास फोटो काढून एलॉन मस्क यांनी शेअर केला आहे आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच मार्विनला टेस्लाची खेळण्यातील गाडी वाढदिवसासाठी भेटवस्तू म्हणून देण्यात आली आहे. ही गोष्ट अनेकांचं लक्ष वेधून घेते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट एलॉन मस्क यांच्या @elonmusk या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे आणि ‘आज मार्विनचा वाढदिवस आहे’ अशी कॅप्शन दिली आहे. तसेच अनेक जण ही पोस्ट पाहून मार्विनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पोस्टमध्ये दिसून आले आहेत. तसेच टेस्लाची खेळण्यातील गाडी एका पाळीव प्राण्याला गिफ्ट दिलेली पाहून अनेक जण भावूक होऊन आपल्या भावना व्यक्त करताना दिसून आले आहेत.