Elon Musk Resignation As Twitter CEO: ट्विटरचा ताबा घेतल्यापासून एलॉन मस्क यांचे नाव काही ना काही कारणाने सतत वादात आहेत. अशातच आता त्यांच्या एका नव्या ट्वीटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मस्क यांनी बुधवारी एक ट्वीट करत म्हंटले की, नवीन ट्विटर धोरण केवळ विज्ञानाचे पालनच करणार नाही तर विज्ञानाला प्रश्न विचारेल. “ट्विटरचे नवीन धोरण विज्ञानाचे अनुसरण करणे आहे, ज्यामध्ये विज्ञानाला तर्कशुद्ध प्रश्न विचारणे हा महत्त्वाचा भाग आहे,” असे मस्क यांनी ट्वीटमध्ये म्हंटले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मस्क म्हणाले, “जो कोणी म्हणतो की त्यांच्यावर टीका करणे म्हणजे विज्ञानावरच शंका घेणे आहे, त्याला वैज्ञानिक म्हणून ओळखले जाऊ शकत नाही.” जरी मस्क यांनी आपल्या योजेनचं वैशिष्ट्य सांगितलं असेल तरी या योजनेचे अधिक तपशील अद्याप जाहीर केलेले नाहीत. एकीकडे एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदावरून राजीनामा देण्याचे वचन दिले आहे. याविषयी एलॉन मस्क यांनी सांगितले की, “माझी नोकरी घेण्याइतपत मूर्ख कोणीतरी सापडल्यावर मी सीईओ पदाचा राजीनामा देईन! व मी फक्त ‘सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचे काम पाहीन”.

आपण ट्विटरच्या सीईओपदी असावे का या प्रश्नावरून ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी १९ डिसेंबरला एक मतदान सुरू केले. जो काही निकाल या पोल मधून येईल त्याचे पालन करण्याचे आश्वासनही मस्क यांनी दिले आहे.

मस्कच्या ट्विटच्या काही मिनिटांत, ५७.५ टक्के वापरकर्त्यांनी ‘हो’ मत दिले होते. यावरही प्रत्युत्तर देत मस्क म्हणाले होते की, तुम्ही ज्याची इच्छा व्यक्त करत आहात ते कदाचित तुम्हाला मिळेलही, म्हणूनच जरा सांभाळून राहा.

इलॉन मस्क ट्वीट

हे ही वाचा<< विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?

दरम्यान, ट्विटरने रविवारी फेसबुक, इंस्टाग्राम, आणि Mastodon यासह इतर विशिष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर खात्यांचा प्रचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या खात्यांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. मस्क यांचा राजीनामा, ट्विटरची नवीन पॉलिसी या दोन्ही ट्विटस नंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk resignation as twitter ceo almost confirmed musk tweets about twitter new policy of questioning science viral svs
First published on: 29-12-2022 at 09:40 IST