ट्विटर खरेदी केल्यापासून एलॉन मस्क हे कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. शिवाय ते सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतात. अनेकजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच त्यांचा असल्याची मिम्सदेखील तयार करत असतात. मस्क हे आपल्या कंपनीच्या प्रगतीचे वर्णन करण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतात. पण सध्या मस्क यांनी एक अनोखा आणि तुम्ही कधीही पाहिला नसेल, असा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत, हा कारण या व्हिडीओत अंतराळात सूर्यास्त होतानाची दृश्य दिसत आहेत.

एलॉन मस्क यांनी हा मंत्रमुग्ध करणारा व्हिडिओ रिट्विट केला आहे. मस्क यांनी रिट्विट केलेला फोटो पहिल्यांदा स्पेसएक्स (SpaceX- Space Exploration Technologies Corporation) नावाच्या अधिकृत ट्विटर पेजवर ट्विट करण्यात आला आहे. आपण अनेकदा सूर्यास्ताचे दृश्य पाहत असतो, शिवाय वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले सुर्यास्ताचे फोटोही आपण सोशल मीडियावर शेअर करत असतो. तर अनेकलोक देश-विदेशातील लोकप्रिय सनसेट पॉइंटवर जाऊन सूर्यास्ताचे दृश्य पाहत असतात. पण थेट अंतराळातील सूर्यास्ताचे दृश्य अनेकांनी पाहिलं नसेल. पण आज तेही तुम्हाला पाहता येणार आहे.

अंतराळातील सूर्यास्त –

हेही पाहा- रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीने काढलेलं स्केच पाहून ड्रायव्हर भारावला; हृदयस्पर्शी Video पाहून नेटकरी म्हणाले…

हेही वाचा- “मैत्री नाही, मस्ती नाही…” बॉसची नोटीस वाचताच कर्मचारी संतापला, ऑफिसमधील चुकीच्या गोष्टी केल्या Viral

एलॉन मस्क यांनी रिट्विट केलेला व्हिडिओ पोस्ट करताना, SpaceX ने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “सूर्यास्ताच्या वेळी स्टेज विभक्त, दुसऱ्या टप्प्याचे इंजिन स्टार्टअप आणि पेलोड फेअरिंग तैनात झाल्यानंतर…”तर हा व्हिडिओ पुन्हा शेअर करताना, Twitter सीईओ एलॉन मस्क यांनी लिहिलं आहे “अंतराळातील सूर्यास्त” असं लिहिलं आहे. हा मनमोहक आणि अनोखा असा सूर्यास्ताचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रामाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर शेअर केल्यापासून हा व्हिडिओ २.५ मिलियहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोक तो व्हिडीओ लाईक करत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने, हे दृश्य अविश्वसनीय असून आपण अंतराळात कधी जाऊ शकतो? असा प्रश्न विचारला आहे. तर अनेकांनी हे सुर्यास्ताचे दृश्य मनमोहक असल्याचं म्हटलं आहे.