Twitter new CEO: Teslaचे सीईओ Elon Musk यांनी गेल्या वर्षी ट्विटर विकत घेतले. ट्विटरचे सीईओ झाल्यापासून मस्क यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. ब्ल्यू टिक संदर्भातील निर्णय असो किंवा स्वतःचे ट्विटर अकाउंट प्रायव्हेट करणे असो तसेच कमर्चाऱ्यांची कपात करणे असे काही निर्णय एलॉन मस्क यांनी घेतले आहेत. मात्र आज मस्क यांनी एक ट्विट केले आहे आणि त्यात ट्विटरच्या नव्या सीईओच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान ट्विटर हँडलवर मस्क यांनी एका कुत्र्याचा फोटो ट्विट केला आहे.

मात्र ट्विटरचा नवीन सीईओ हा माणूस नसून एक कुत्रा आहे. याबाबत मस्क यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. हा कुत्रा एलॉन मस्कचा पाळीव कुत्रा फ्लोकी (शिबा इनू) आहे. एलॉन मस्कने त्या कुत्र्याचा स्टाईलमध्ये असलेला एक फोटो ट्विट करत त्याचे कौतुक केले आहे.

दरम्यान , एलॉन मस्क यांनी कुत्र्याचा फोटो ट्विट करत ट्विटरचा नवीन सीईओ म्हणून त्या कुत्र्याची घोषणा केली. मस्क यांनी ट्विटमध्ये सांगितले की, हा तर ‘त्याच्या’पेक्षाही अधिक चांगला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर विकत घेतले. या करारापूर्वी एलॉन मस्क यांच्या फसवणुकीसंदर्भात तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांच्यात वाद झाला होता. एकेकाळी ट्विटर सोबतचा एलॉन मस्क यांचा करार पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर एलॉन मस्कला ट्विटर खरेदी करावे लागले. महत्वाची बाब म्हणजे ट्विटर विकत घेतल्यानंतरच तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक जुन्या कर्मचाऱ्यांना मस्क यांनी काढून टाकले होते.