Wedding video: लग्न म्हटलं की आनंद, उत्साह, धावपळ आणि घरभर पसरणारी लगबग. पण, याच आनंदाच्या क्षणात काही क्षण असेही असतात जे मनाला चटका लावून जातात. त्यात भावा–बहिणीचं नातं म्हणजे खास. लहानपणापासून सतत भांडणं, चिडवाचिडवी, एकमेकांवर रुसवे–फुगवे करत वाढलेलं हे नातं, लग्नाच्या दिवशी मात्र अचानक भावूक होतं. बहिणीला लग्नाच्या वेषात पाहताच भावाच्या मनात किती भावना उसळतात हे शब्दांत सांगता येत नाही. अशाच एका दृश्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ एका लग्नातील अत्यंत भावनिक क्षण टिपतो. मंगलअष्टकांच्या वेळी जेव्हा नवरी हातात हार घेऊन मंडपात उभी असते तेव्हा मनाला भिडणारा क्षण घडतो लग्नाच्या गडबडीत हसण्या–खिदळण्यामध्ये अचानक एक शांतता पसरते, कारण या बहिणीचा लहान भाऊ तिच्या मंगलअष्टकांच्या वेळी आपल्या भावना लपवू शकत नाही.
व्हिडीओमध्ये बहीण नवरीसारखी सजून स्टेजवर मंगलअष्टकांसाठी उभी आहे. तिच्या शेजारी नवरदेव उभा आहे आणि त्या दोघांचा व्हिडीओ काढला जात आहे. पण, स्टेजच्या खाली उभा असलेला तिचा लहान भाऊ अचानक रडू लागतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो ते थांबवायचा प्रयत्न करत असला तरी अश्रू सतत येतच राहतात. बहिणीकडे बघत तो खूप भावूक होऊन रडत राहतो.
पाहा व्हिडिओ
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ log.kya.sochenge या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ एका लग्नातील अत्यंत भावनिक क्षण टिपतो. लग्नसोहळा सुरु असताना मंडपात एक शांत, तरी मनाला भिडणारा क्षण घडतो. लग्नाच्या गडबडीत हसण्या–खिदळण्यामध्ये अचानक एक शांतता पसरते, कारण बहिणीचा लहान भाऊ तिच्या हार घालण्याच्या विधीच्या वेळी भावनांनी भरून येताना दिसतो.
हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स अक्षरशः भारावले आहेत. अनेकांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, “भावा–बहिणीचं नातं असंच असतं; भांडण, नोकझोक,पण शेवटी हृदयाला हात घालणारी माया!” तर काहींनी म्हटलं, “बहिणीची बिदाई म्हणजे भावासाठी सर्वात कठीण क्षण. कितीही मजबूत दिसला तरी मनातलं प्रेम असेच बाहेर येतं.”
काहींनी लहान भावाच्या निरागस भावनांचे कौतुक करत लिहिले, “ही निरागसता आजकाल क्वचितच दिसते. हे नातं खरंच अनमोल आहे.” तर अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या स्टोरीमध्येही शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, हा क्षण पाहून ते स्वतःही भावूक झाले.
