पालकत्व ही सर्वात कठीण गोष्ट आहे. मुलांना जन्म दिला म्हणजे आई-वडीलांची जबाबदारी संपत नाही, मुलांवर योग्य संस्कार करणे ही देखील पालकांची जबाबदारी असते. पालकांनी मुलांवर योग्य संस्कार केले नाही तर कालंतराने मुले हट्टी आणि बेशिस्त होतात. पालकांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही आणि सार्वजनिक ठिकाणी चुकीची वर्तणूक करतात ज्यामुळे पालकांची मान शरमेने खाली झुकते. सध्या असाच काहीसा प्रकार घडला आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियार तुफान व्हायरल होत आहे.

वॉलमार्ट स्टोअरमध्ये ही घडना घडली आहे ज्यामध्ये एका मुलीने स्टोअरमधील वस्तू फेकून देत गोंधळ घातल्याचे दिसत आहे.आश्चर्यकारक म्हणजे,वॉलमार्टच्या कर्मचाऱ्यांनी या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

हा व्हिडीओ नक्की केव्हाच आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही. व्हायरल व्हिडिओत मुलगी वॉलमार्टच्या कपाटांना लाथा मारताना आणि मॉलमधील वस्तू खाली फेकताना दिसत आहे. या चिमुकलीने वाईनच्य बाटल्या देखील फोडल्या आहेत.

व्हिडिओची सुरुवात मुलीच्या कपाटाला लाथा मारण्यापासून होते. त्यानंतर ती प्रोटीन स्नॅक्सच्या मोठ्या रॅकजवळ गेली आणि तिने स्नॅक्स हातात घेऊन खाली फेकले.

काचांच्या बाटल्या फोडल्या, वाइन सांडवली

मुलगी वारंवार वस्तू फेकत आणि स्टोअरमध्ये कचरा करताना दिसत आहे. तिने काही काचेच्या बाटल्या फोडल्या, ज्यामध्ये केडेम वाइनरीच्या स्पार्कलिंग ग्रेप वाइनचा समावेश होता.

एक्सवर I Meme Therefore I Am ?? @ImMeme0 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “काही लोकांना मुले नसावीत!”

हेही वाचा – स्पॅम कॉल्स आणि एसएमएसमुळे वैतागला आहात? Jio नेटवर्क वापरकर्त्यांना मिळणार सुटका, कशी ते जाणून घ्या..

या व्हिडिओनंतर नेटिझन्समध्ये संताप व्यक्त केला जात असून, मुलीच्या पालकांच्या वागणुकीवरही टीका होत आहे.
काहींनी कमेंट करत म्हटले की, “माझ्या आईने मला तिथेच चोपले असते सर्वांसमोर”

हेही वाचा –स्पॅम कॉल्स आणि एसएमएसमुळे वैतागला आहात? Jio नेटवर्क वापरकर्त्यांना मिळणार सुटका, कशी ते जाणून घ्या..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्याने म्हटले, “सर्व नुकसान भरपाई पालकांना द्यावा लागेल. कदाचित ते आपल्या मुलांना योग्य ते चूक शिकवायला शिकतील.”