सध्या २००० रुपयांची नोटबंदी चर्चेचा विषय आहे. अशातच मार्केटमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा आल्याची चर्चा आहे. सध्या असंच एक प्रकरण समोर आले आहे. खेळण्यातील बनावट नोट देऊन एका आंबा विकणाऱ्या महिलेची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्यातील पेण येथील ही घटना आहे. येथील राजू पोटे मार्गावर आंबे विकायला बसलेल्या एका आदिवासी महिलेला एका माणसाने बनावटी नोट देऊन आंबे घेतले आणि महिलेची फसवणूक केली. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

हेही वाचा : Optical Illusions : तुम्हाला फोटोमध्ये समुद्र दिसतोय का? पण हा समुद्र नाही, एकदा क्लिक करून पाहा

रावण (@rawan2778) या ट्विटर अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये फसवणूक झालेल्या आदिवासी महिलेचा पोस्ट करुन कॅप्शनमध्ये लिहिले, “पेण मध्ये राजू पोटे मार्गावर आंबे विकायला बसलेल्या आदिवासी महिलेला एका माणसाने खेळण्यातील नोट देऊन आंबे घेतले. या लोकांनी लोक मेहनत केली की चूल पेटते आणि त्याची फसवणूक करणे किती योग्य. फसवणाऱ्या माणसाचा गाडी नंबर 5441 ॲक्टिवा”

हेही वाचा : लोकल ट्रेनमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला अन्… पाहा अंगावर काटा आणणारा Video

विशेष म्हणजे गाडी नंबरही सांगितला आहे. त्यामुळे या फसवणाऱ्या व्यक्तीला पकडू शकता येते. या पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. एक युजर लिहितो, “गोरगरीबांना तरी फसवू नका ! कोणाच्या हळहळीचा पैसा , वस्तू घेऊन त्याला पचणार नाही” तर दुसरा युजर लिहितो, “आंबे पचणार नाहीत त्या मूर्ख माणसाला..” आणखी एक युजर लिहितो, “गरीब लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवताना लाज कशी वाटत वाटत नाही…माणसाने एवढं सुध्दा नीच नसावं..”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake currency notes of rs 500 circulation a case detected in raigad someone gave fake note of 500 rs to mango seller woman ndj
First published on: 06-06-2023 at 18:53 IST