नागपूर : वडिल आणि भावाच्या मृत्यूनंतर बंगल्यात एकटी राहणाऱ्या महिलेकडून तीन कोटी रुपयांचे दागिने लुटण्याचा कट रचून आलेल्या दरोडेखोरांनी महिलेस ओलिस ठेवले. सुरक्षारक्षकावर हल्ला करीत लुटमार करून पलायन केले. या दरोडेखोरांच्या शोधासाठी मानकापूर पोलिसांनी पाच-दहा नव्हे तर जवळपास एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या लुटमारीत पोलिसांनी तब्बल ११ दरोडेखोरांना अटक केली.

रश्मी पांडे (४२) रा. गांधी ले-आऊट, जाफरनगर या वडील आणि भावांच्या मृत्यूनंतर घरी एकट्याच राहतात. त्यांनी रमाशंकर दुबे (५७) रा. एकतानगर, गोरेवाडा यांना सुरक्षारक्षक म्हणून ठेवले आहे. रश्मी यांच्याकडे दोन ते तीन कोटी रुपये असून, त्या घरी एकट्याच राहतात, अशी माहिती आरोपींना मिळाली होती. आरोपींनी दरोड्याचा कट रचला. योजनेप्रमाणे ३० मार्चला पहाटे बुरखाधारी आरोपी त्यांच्या घरी आले. सब्बलीने घराचे दार तोडून आत घुसले. हॉलमध्ये बसलेल्या रमाशंकर यांना काही कळण्यापूर्वीच चाकूने जखमी केले. रमाशंकर यांची आरडाओरड ऐकून रश्मी यांची झोप उघडली. दरोडेखोरांनी रश्मी यांना धमकावत घरातील दागिन्यांबाबत विचारले. आरोपींनी रश्मीच्या पर्समध्ये ठेवलेले दागिने, रोख ३० हजार व ४ मोबाईल लुटून पळ काढला. रश्मी हॉलमध्ये आल्या असता रमाशंकर जखमी अवस्थेत पडून होते. रश्मी यांनी घरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी डीव्हीआरही घेऊन गेले होते.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Tehsil Office Tehsildar Sachin Shankarlal Jaiswal of Sindkhedaraja arrested for accepting bribe
तहसीलदाराकडे सापडले तब्बल ४६ लाखांचे घबाड! लाच स्वीकारतांना अटक
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा…लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उणीदुणी; जनतेचे मनोरंजन! उमेदवारांनी विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा

रश्मी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एक पथक तयार करून तपास केला. पोलिसांनी मानकापूर, गिट्टीखदान, अंबाझरी आणि संशय असलेल्या परिसरातील तब्बल एक हजार सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज तपासण्यासाठी पथकाने अथक मेहनत घेतली. तांत्रिक तपासाच्या आधारे एक-एक करीत सर्वच ११ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. यातील आरोपी आशिष हा बी. कॉम.च्या अंतिम वर्षाला शिकतो. यापूर्वी त्याच्यावर गुन्ह्याची नोंद आहे. तसेच आरोपी गोपाल याच्यावरही हत्येचा गुन्हा आहे. आरोपींजवळून सोन्या-चांदीचे दागिने, १६ मोबाईल, रोख रक्कम, दोन चारचाकी वाहने, दोन दुचाकी वाहने असा एकूण ५ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा…आरोपीला जामीन दिल्यामुळे बलात्कार पीडितेने न्यायालयात घातला गोंधळ

आशिष मेश्राम रा. पारशिवनी, आशिष डेडूरकर रा. पारशिवनी, प्रणय ऊर्फ अमन पहाडे रा. पारशिवनी, अमित गजभिये रा. पारशिवनी, मोहम्मद साजित रा. जुनी कामठी, मो. जाकीर रा. जुनी कामठी, प्रेमसिंग ऊर्फ गोपाल बिसेन रा. पारडी, शेख आरिफ ऊर्फ पप्पू बिसमिल्ला रा. न्यू मानकापूर, राहुल कर्णेवार रा. गोधनी, विकास पाटील रा. हिंगणा आणि रूपेश टोपरे रा. मानकापूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.