Gold Fraud video: लग्नसराई सुरू झाली आहे. लग्नसराईमध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. याशिवाय आजकाल गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणूनही सोने खरेदी केली जाते. खरं तर अनेक शतकांपासून सोने हा एक गुंतवणूक करण्यासाठी विश्वासार्ह पर्याय आहे. यामध्ये जोखीम खूपच कमी आहे. जगभरातील व्यक्ती सोन्यात गुंतवणूक करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याचा भाव झपाट्याने वाढताना दिसत आहेत. १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा दर आता एक लाखांच्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. अशातच सोन्याच्या दागीण्यांमध्ये फसवणूक होत असल्याचा पुरावाच समोर आला आहे. यामध्ये एक व्हिडीओ व्हायरल होतोय यामध्ये कशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जाते हे समोर आलं आहे.

अनेकदा कमी मेकींग चार्जेस पाहून आपण त्या ज्वेलर्सच्या दुकानात जातो आणि तिथे आपली फसवणूक केली जाते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका व्यक्तीनं सोन्याचं कडं विकत घेतलं होतं. हे कडं जवळ जवळ ५ ते ६ तोळ्याचं दिसत आहे. मात्र या व्यक्तीला काहीतरी शंका येते आणि ते कडं तो तोडते आणि जे समोर दिसलं ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. या कड्याच्या आतमध्ये चक्क लोखंड असल्याचं दिसत आहे. वजन वाढवण्यासाठी हे केलं गेलं होतं. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही सोनं खरेदी करण्याआधी शंभर वेळा विचार कराल.

पाहा व्हिडीओ

सोनं खरेदी करताना अशी घ्या काळजी

सर्वांत महत्वाचं म्हणजे हॉलमार्क असलेल्या दागिन्यांचीच तुम्ही खरेदी करा. बीआयएस हॉलमार्क दागिने सोन्याच्या शुद्धतेचं प्रतीक आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी करताना हॉलमार्क पाहणं महत्त्वाचं आहे. सोने खरेदी करताना त्याचं वजन तपासणे खूप महत्त्वाचे असते. वजन किंचित कमी असलं तरी तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. सोन्याची खरेदी करताना सोन्याची शुद्धता तपासावी. २४ कॅरेट सोनं सर्वांत शुद्ध असतं. अशा सोन्याची नाणी, बिस्किटे विक्रीसाठी उपलब्ध असतात. तर, सोन्याचे दागिने सामान्यतः १८ ते २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामध्ये इतर धातूही मिश्रित असतात. सोने खरेदी केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्वेलर्सकडून बिल घेण्यास विसरु नका. बिलावर मेकिंग चार्ज आणि जीएसटीसंबंधी सर्व आवश्यक माहिती दिलेली असल्याची खात्री करा.

सोन्याची शुद्धता तपासून घेणं महत्वाचं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोन्याची खरेदी करताना सोन्याची शुद्धता महत्वाची असते. सोन्याची शुद्धता तपासून घ्यावी. २४ कॅरेट सोनं म्हणजेच ९९९ अंकित सोने सर्वात शुद्ध असते. तुम्ही सोन्याचे दागिने सामान्यतः १८ ते २२ कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यामध्ये इतर धातूही मिश्रित असतात. तर २४ कॅरेट सोन्याचे दागिने न बनवता सोन्याच्या नाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेटचे सोने वापरले जाते.