Lavani Dancer Viral Video: मागील काही काळात गौतमी पाटीलला लावणीचे धडे देताना अनेकांना महाराष्ट्राच्या लावणी कलेचा अचानक पुळका आल्याचे आपणही पाहिले. दुर्दैवाने सोशल मीडियावर हे ज्ञान देणाऱ्यांना तीन चार नावे सोडल्यास लावणीसाठी आपले आयुष्य झोकून देणाऱ्या अनेक कलाकारांविषयी अजूनही कल्पना नाही. अशाच एका दुर्लक्षित लावणी सम्राज्ञीवर बस स्टेशनवर उभे राहून भीक मागण्याची वेळ सध्या आली आहे. याचा एक व्हिडीओ सुद्धा प्रचंड चर्चेत आहे. ज्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं. ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे.

माध्यमाच्या रिपोर्ट्सनुसार, शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांनी आपल्या लावणीच्या जोरावर उत्तर महाराष्ट्र गाजवला होता. लालबाग परळच्या हनुमान थिएटरमधील ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा आजही अनेकांना आठवत असेल. पन्नास-साठ लोकांच्या उदरनिर्वाहाचे माध्यम बनलेल्या शांताबाई यांना त्यांच्याच कार्यक्रमाच्या निर्मात्याने धोका दिल्याचे सांगितले जाते. अशिक्षित असल्याने पैशाची आकडेमोड न कळल्याने शांताबाईंची आयुष्याची जमापुंजी अनेकांनी लुटून नेली आणि याच धक्क्यातून त्यांना मानसिक आजारांनी ग्रासले. पती, नातेवाईक कुणाचाच आधार नसलेल्या शांताबाई कोपरगाव बसस्थानकात राहून भीक मागून पोट भरत असल्याचे म्हटले जातेय.

शांताबाईंचे वय आज ७५ वर्षे आहे. विस्कटलेले केस, फाटकी साडी, आणि आपली वळकटी घेऊन त्या ‘ओळख जुनी धरून मनी’ ही लावणी गात कोपरगाव स्थानकात बसलेल्या असतात. याच रूपातील त्यांचा एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Loksatta (@loksattalive)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्टनुसार, सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉ.अशोक गावीत्रे यांनी शांताबाई यांना वैद्यकीय मदत देऊ केल्याचे समजतेय. तसेच आता या परिस्थितीनं बाहेर पाडण्यासाठी शांताबाईंना सरकारतर्फे वैद्यकीय खर्च व नंतर राहण्यासाठी घर उपलब्ध करून द्यावे अशीही मागणी होत आहे.