हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. तरुण देखील या आजाराचे शिकार होत आहेत. एखाद्या व्यक्तीला जर अचानक छातीत तीव्र वेदना सूरू झाल्या तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असु शकते. अशावेळी नेमकं काय करायचं हे सुचत नाही, जर त्या व्यक्तीला हॉस्पिटलला नेण्यास जरा जरी उशीर झाला तर त्या व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काही सेकंदाच्या या अवधीमध्ये काहीही होऊ शकते. या प्रसंगाचा विचार केला तरी आपण काळजीत पडतो. असाच एक प्रसंग आंध्रप्रदेशमध्ये घडला.
आंध्रप्रदेशमध्ये शेतकऱ्यांकडुन महापदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो खाली कोसळला. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यावर ‘सीपीआर’ करत त्याचा जीव वाचवला. पाहा या घटनेचा व्हिडीओ.
व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ आंध्रप्रदेश पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी के. वी. राजेंद्रनाथ रेड्डी यांच्या प्रसंगावधानामुळे या शेतकऱ्याचा जीव वाचला. यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, के. वी. राजेंद्रनाथ रेड्डी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.