Viral video: शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता भासत आहे. शेतीची कामे कमी व्हावी म्हणून ग्रामीण भागात अनेक शेतकरी नवनवीन जुगाड शोधून काढत आहे.‘गरज ही शोधाची जननी असते’, ही आपल्यासाठी केवळ एक म्हण किंवा वाक्प्रचार असेल. अशाच एका शेतकऱ्यानं हा भन्नाट जुगाड केला आहे.

आपल्याला तर हे माहित आहे की, जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरु शकत नाही. आपल्याकडे लोकांना प्रत्येक गोष्टीत जुगाड करण्याची सवय आहे. त्यामुळे दररोजच्या वस्तुंपासून ते अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी जुगाड करतात. भारतीयांच्या जुगाडाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर तुम्ही बरेच व्हिडीओ किंवा फोटो पाहिले असणार जे तुम्हाला आश्चर्यचकीत करतात. अशातच शेतकरीही कशातच मागे नाहीत.यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशांची देखील बचत होतेय. शिवाय शेतीच कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते. यात अनेक शेतकरी रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या टेक्निक वापरत असल्याचे पाहायला मिळते. अशाप्रकारे एका शेतकऱ्याने रान डुक्करापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एक ढासू जुगाड शोधून काढला आहे. ज्यामुळे डुक्करच काय कुणी माणूसही घाबरून पळून जाईल.

शेतकऱ्यांच्या शेतात आता धानपीक डौलाने उभे असते. शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाकरिता चांगले पीक येणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी यावर्षी चांगले पीक येईल या आशेने शेतात खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या रानडुकरे शेतात घुसून धानाच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. यावरच शेतकऱ्यानं एक जबरदस्त जुगाड केला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पिक काढल्यानंतर आलेलं धान्य शेतात सुकवण्यासाठी, पाखडण्यासाठी शेतकऱ्यानं पसरवून ठेवलं आहे. यावेळी कोणते प्राणी, पक्षी यामध्ये येऊ नये यासाठी या शेतकऱ्यानं चक्क एक स्पिकर शेतात लावलाय. या स्पीकरमधून माणसांचे वेगवेगळे आवाज येत आहेत. म्हणजे जेव्हा कुणी नसेल तेव्हाही जनावरांना असं वाटेल की त्याठिकाणी कुणीतरी आहे. यावेळी त्याचा जो आवाज होतो तो ऐकून डुक्कर घाबरून अजिबात शेतात येणार नाही. तसेच शेतकऱ्याला पिकाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस शेतात राहावे लागणार नाही.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच शेतीच्या सुरक्षेसाठी देशी जुगाड करण्यात शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक शेतकरी पक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या युक्ती वापरतात, अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांनी पक्ष्यांना रोखण्यासाठी जुगाड शोधून काढले आहे.