Farmer desi jugaad video : आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देश कितीही प्रगत झाला असला तरी देशातील बहुतेक लोक आजही शेतीतून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहेत शेती म्हटलं की नांगरणी आली आणि नांगरणीसाठी लागतात ते बैल किंवा ट्रॅक्टर. पण काही हे दोन्ही उपलब्ध नसेल तर काय? खरंतर काहीच फरक पडणार नाही. कारण बैल आणि ट्रॅक्टरशिवायही नांगरणी करता येऊ शकते. बैलांशीवाय नांगरणी करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. पण शेतीसाठी केलेला हा देशी जुगाड सर्वांना आवडला आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण करणाऱ्याकडेही केंद्र आणि राज्य सरकारचा भर आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे. त्यामुळे आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु सध्या असाच एक शेतात व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शेतकऱ्याचा जूगाड पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.आपले कष्ट वाचविण्यासाठी शेतकऱ्यानं केलेली ही ट्रीक नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंती उतरली आहे. परंतु नक्की या शेतकऱ्यांनं केलं काय? अशा नक्की कोणत्या पिकांवर त्यानं हा जुगाडाचा प्रयोग केला? आणि त्यानं हे कसं काय केलं? असे प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल तेव्हा हा लेख जाणून घेऊन तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. तेव्हा तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पाहा. तुम्हालाही कदाचित या व्हिडीओतून प्रेरणा मिळेल. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे.
एका तरुणाने चक्क आपल्या बाईकने नांगरणी करून दाखवली आहे. शेतात बाईक घेऊन नांगरणी करणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आता तुम्ही म्हणाल बाईकने नांगरणी कशी बरं करता येईल. तर हा व्हिडीओ पाहा. व्हिडीओत पाहू शकता, या तरुणाने आपल्या बाईकच्या मागील दोन चाकांना एक छोटा नांगर जोडला आहे. जसं तो शेतात बाईक चालवतो तसतसं नांगरही पुढे जातं आणि अगदी कोणत्याही मेहनतीशिवाय शेत नांगरलं जातं.
पाहा व्हिडीओ
देसी जुगाडच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीही पकडू शकत नाही. यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशांची देखील बचत होतेय. शिवाय शेतीच कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली आहे. शेतात शेतकरी किती राबत असतो याची आपल्यालाही कदाचित जाणीवही नसेल.