सोशल मीडियावर दररोज नवनवीन जुगाडाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय कोण कधी कसला जुगाड करेल हे सांगता येत नाही. कधी कुणी कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी कुणी विटातून कुलर बनवतो. नुकतेच एका व्यक्तीने स्प्लेंडरला बॅटरी जोडून इलेक्ट्रीक बाईक बनवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एक स्प्लेंडरशी संबंधित व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याने जुन्या बाईकपासून चक्क ट्रॅक्टर बनवला आहे. शिवाय हा ट्रॅक्टर देखील असा आहे की, तो शेतकऱ्यांची शेतातील अनेक कामे सोप्पी करत आहे. बाईकपासून बनवलेल्या या जुगाडू ट्रॅक्टरच्या व्हायरल व्हिडिओमध्ये, एका शेतकऱ्याने आपल्या जुन्या स्प्लेंडर बाईकच्या साह्याने एक मिनी ट्रॅक्टर बनवल्याचं दाखवण्यात आलं आहे.
या शेतकऱ्याने बाईकवर थोडा खर्च करून त्या व्यक्तीने ट्रॅक्टर बनवला आहे. त्या व्यक्तीने दुचाकीचा मागील टायर काढून त्या जागी नांगर लावला आहे. दोन टायर जोडून बाईकलाच मिनी ट्रॅक्टरचा लूक दिला आहे. एवढेच नाही तर या मिनी ट्रॅक्टरच्या साह्याने हा माणूस आपल्या शेतात नांगरणी करत असून ट्रॅक्टरप्रमाणे सावली देण्यासाठी वरती शेड देखील लावलं आहे.
व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोक शेतकऱ्याच्या जुगाडाचे आणि त्याच्या बुद्धीचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर krishna_krishi_yantra नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या पेजवर तुम्हाला या शेतकऱ्याचे आणखी काही व्हिडिओ दिसतील ज्यामध्ये तो या मिनी ट्रॅक्टरच्या साह्याने शेतातील कामं करत आहे. हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांना आवडला असून शेतकऱ्याने आपल्या शेतीसाठी केलेला हा जुगाड अप्रतिम असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, भावाने सर्व इंजिनीअर्सचा पराभव केला आहे. दुसर्याने लिहिले आहे, “कमी पैशात अप्रतिम ट्रॅक्टर बनवला आहे.” तर आणखी एकाने “मलाही अशी मशीन हवी आहे” अशी कमेंट केली आहे.