तुम्ही आजपर्यंत रिक्षामध्ये तीन जण आणि ड्रायव्हरच्या सीट बाजुला दोन जण असे एकुण पाच जण बसलेले पाहिले असेल. कायद्यानुसार तर रिक्षामध्ये केवळ तीन जणांनाच बसायला परवानगी असते. मात्र, लोक काहीही जुगाड करू शकतात. असाच एक जुगाडू व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका रिक्षामध्ये एक दोन नव्हे, तुम्ही पाहिल्याप्रमाणे पाच जणही नाही तर तब्बल २७ जण बसलेले दिसून येत आहेत. इतके २७ जण रिक्षामध्ये कसे काय मावले असतील, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. कदाचित तुमचा यावर विश्वासही बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. हे दृश्य पाहून चक्क पोलीस सुद्धा चक्रावून गेले होते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधल्या फतेहपुर जिल्ह्यातला आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील बिंदकी कोतवाली परिसरातून काही लोक ऑटो रिक्षाने निघाले होते. रिक्षात परवानगीपेक्षा जास्त लोक बसलेले पाहून पोलिसांनी रिक्षा अडवली, तेव्हा त्यातील लोक पाहून पोलीस चक्रावून गेले. रिक्षात चालकासह एकूण २७ जण होते. पोलिसांनी एकामागून एक मोजणी करून सर्व लोकांना खाली उतरवले तेव्हा ही संख्या २७ इतकी झाली. ऑटोचालक महराह येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे, सर्व लोक घरातून बकरीदची नमाज अदा करण्यासाठी बिंदकी येथे आले होते. कारवाई करत पोलिसांनी रिक्षा जप्त करून पोलिस ठाण्यात पाठवली. एका ऑटोरिक्षात २७ जण कसे बसले असतील, अशी चर्चा सध्या परिसरातील नागरिक करत आहेत.

आणखी वाचा : हात, पाय, तोंडात धरून फळे घेऊन जाणाऱ्या या चिंपांझीचा VIDEO VIRAL, पाहून पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीची शिकार करण्यासाठी एक-दोन नव्हे तर सात सिंहीणींचा घेराव, पण…पुढे काय घडतं पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस रिक्षामधून लोकांना उतरवत असताना कोणीतरी या प्रकरणाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ नंतर बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित होत यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी यावर वेगवेगळे विनोद शेअर करण्यास सुरूवात केली आहे, तर काही आश्चर्य व्यक्त केलंय.