Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर दोन व्यक्तीचे आयुष्य बदलते. विशेषत: मुलीचे. कारण तिला आईवडील सोडून सासरी जावं लागतं. हा क्षण एका मुलीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक क्षण असतो. लहानाचं मोठं करणारे आईवडिल जेव्हा मुलीच्या डोक्यावर अक्षता पडताना पाहतात, तेव्हा खूप भावुक होतात. लग्नातील प्रत्येक विधी या अत्यंत भावुक करणाऱ्या असतात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरी एकमेकांना वरमाला घालण्यासाठी स्टेजवर उभे असलेले दिसत आहे. पण नवरीची नजर कोणाला तरी शोधत आहे. ती कोणाला शोधत असेल? हे तुम्हाला व्हिडीओतून दिसून येईल.
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. स्टेजवर नवरदेव नवरी हातात वरमाला घेऊन उभे आहेत. भटजी त्यांना वरमाला घालण्यास सांगतात. तेव्हा नवरी कुणाला तरी शोधताना दिसते. त्यानंतर नवरी भटजीच्या कानात काहीतरी सांगते. थोड्या वेळानंतर स्टेजवर तिचे आईवडील येतात आणि तिला आईवडील दिसताच ती नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घातले आणि त्यानंतर नवरदेव सुद्धा मुलीच्या गळ्यात वरमाला घालतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. एका मुलीची नजर तिच्या वडिलांना शोधत असते. एक मुलीसाठी तिचे वडील सुपरहिरो असतात तर एका वडिलांसाठी त्यांची लेक ही एका राजकुमारीपेक्षा कमी नसते. बाप लेकाचे नाते जगावेगळे असते, हे तुम्हाला व्हिडीओतून दिसून येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
aboli_magic__touch_of_class या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बापाची आन- बान- शान, काळजाचा तुकडा असते मुलगी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माळा हातात होती, पण डोळे बाबांना शोधत होते… कारण आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेताना, ‘बाबा’ फक्त जवळ असावेत, इतकीच इच्छा होती!” तर एका युजरने लिहिलेय, “शेवटी बाप तर बापच असतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “शेवटी बाप आहे तो नजर तर त्यालाच शोधणार ना” एक युजर लिहितो, “स्वतःच्या बापाने तळ हाता सारखी सांभाळलेली लक्ष्मी म्हणजे आपली लेक” तर एक युजर लिहितो, “किती वेळा तरी हा व्हिडिओ पाहिला पण मनच भरत नाही” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर भावुक करणाऱ्या कमेंट्स लिहिल्या आहेत. जवळपास तीन लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.