Father emotional video: आई-वडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतात. स्वत: फाटके कपडे अन् फाटक्या चपला घालतील; मात्र मुलांना शाळेत नवीन वह्या-पुस्तकांपासून ते दप्तरापर्यंत अनेक गोष्टी घेऊन देतील. स्वत:ला कुठे दुखत, खुपत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करून, मुलांसाठी जीवापाड मेहनत करतील. अनेकदा आपल्याला आईचे कष्ट, तिची माया दिसून येते; पण वडिलांची माया, त्यांचे कष्ट आपल्याला दिसत नाहीत. आयुष्यात कधी कठीण प्रसंग आला, तर आई रडून मोकळी होते. पण वडील आपले दु:ख लपवत कुटुंबासाठी एक ढाल म्हणून उभे राहतात, सगळ्यांना सावरून घेतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामधून एक बाप आपल्या लेकरांसाठी काय करु शकतो हे पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

पाठीचा कणा वाकला तरी…

पाठीचा कणा वाकला तरी पोराच्या शिक्षणासाठी जीव तोडून कष्ट करणाऱ्या ड्रायवर बापाचा हा व्हिडीओ आहे. वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात; ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक ७० वर्षाचे आजोबा भर उन्हात ट्रक चालवत आहेत. वयामुळे त्यांची तब्येतही खराब झाली आहे तसेच त्यांच्या पाठीचा कणाही वाकला आहे. त्यांना नीट बसताही येत नाहीये. त्यांनी अक्षरश: त्यांच्या पाठीच्या कण्याला बांधून ठेवलं आहे. आजोबांचं एवढं वय झालंय मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह आणि तेज पाहायला मिळत आहे.

या आजोबांचा व्हिडीओ तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीने शूट केला आहे. यावेळी ते आजोबांना प्रश्नही विचारत आहेत. आजोबा या वयातही एवढे कष्ट का तुम्हाला मुलं नाहीत का? यावर आजोबा मुलं शिकत आहेत असं उत्तर देत स्मितहास्य करतात. मुलांसाठी बाप किती कष्ट करु शकतो हे या व्हिडीओतून पाहायला मिळतंय.

VIDEO पाहून कळेल बाप काय असतो

हा व्हिडीओ durva_official_96k नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सर्व माहिती दिली आहे. “काल मम्मी, पप्पा सोबत गावी जाताना अचानक ट्रक मधील ड्रायव्हर आजोबांकडे लक्ष गेलं. प्रश्न पडला की, या वयातही ड्रायव्हिंग का करतात आजोबा ? आणि मन सुन्न झालं. कारण ज्या ड्रायव्हर आजोबांनी या वयात आपल्या नातवंडा सोबत मजेत दिवस घालवायला हवे होते त्या ड्रायव्हर आजोबांनी ऐन सत्तरीत ट्रक चालवून स्वतःला एवढा त्रास का करून घ्यायचा ? आजोबांनी वाहन चालवताना आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट लावायला हवा होता, त्या ठिकाणी त्यांनी बेल्ट न लावता त्यांच्या वाकलेल्या कण्याला लोखंडी पट्ट्यानी आधार दिला होता. ते पाहून मन सुन्न होऊन डोळ्यात अश्रू निघू लागले. पप्पांनी त्यांच्या कष्टाला सॅल्यूट केला आणि या वयात कशाला करताय ड्रायव्हिंग ? मुलं नाहीत काय ? असे प्रश्न पप्पांनी विचारले असता, मुलांचे शिक्षणासाठी एवढा त्याग करतोय असं उत्तर दिल. आणि आजोबा निघून गेले. बाप काय असतो, बापाची माया काय असते बघा.. म्हणलंय ना की, लय अवघड हाय गड्या उमगाया “ बाप ” रं. ” असं कॅप्शन लिहलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या वडिलांची नक्की आठवण होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कधी अश्लील भाषा तर कधी चुकीचा स्पर्श; शाळेबाहेर छेड काढणाऱ्याला तरुणीने मास्टरमाईंडने पकडलं, VIDEO पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की,  “वडिलांचे प्रेम दिसत नाही; पण ते आहे. त्यांच्या मेहनतीला काय म्हणावे.”