अनेकदा फिल्म स्टार्सना सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर चाहत्यांपासून सुटका करणे खूप अवघड होऊन जाते. कारण अनेकजण त्यांच्याबरोबर फोटो, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतात. जसे फिल्म स्टार्सचे चाहते आहेत तसेच काही प्रसिद्ध न्यूज अँकरचे देखील चाहते मोठ्या प्रमाणात असतात. काहीवेळा याच चाहत्यांमुळे अँकर्सना रिपोर्टींग करणं अवघड होतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका न्यूज अँकरच्या चाहत्याने तिचे लाईव्ह रिपोर्टिंग सुरु असताना मध्येच तिला धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये महिला अँकर रिपोर्टींग करत असताना अचानक तिच्याजवळ एक माणूस येतो. यावेळी तो तिला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करतो तरीदेखील ती अँकर हसऱ्या चेहऱ्याने रिपोर्टिंग करते. शिवाय तिने खूप छान पद्धतीने ही परिस्थिती हाताळल्यामुळे अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ सीबीएस मियामीची रिपोर्टर समांथा रिवेरा हीचा आहे. व्हिडिओमध्ये ती लाईव्ह रिपोर्टिंग करत असचाना तिचा एक चाहता कॅमेरासमोर येण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. लास वेगासमध्ये, आइस हॉकीमधील व्हेगास गोल्डन नाईट्सच्या द फ्लोरिडा पँथर्सवर मिळवलेल्या विजयाचे ती रिपोर्टींग करत होती. यादरम्यान, ती सतत एका हाताने त्या माणसाला धक्का देत आहे जो तिला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करत होता.




हेही पाहा- लग्न समारंभात शंख आणायला विसरले भटजी, ऐनवेळी केला भन्नाट जुगाड, व्हायरल Video पाहून पोट धरुन हसाल
तरीरी तिने हसऱ्या चेहऱ्याने केलं रिपोर्टिंग –
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे संपूर्ण व्हिडिओमध्ये, सामंथा संयमाने आणि हसऱ्या चेहऱ्याने रिपोर्टींग करत आहे. यावेळी तिला चाहत्याचा खूप राग आला तरीही तिने रागावर नियंत्रण ठेवले आणि थेट रिपोर्टिंगवर लक्ष केंद्रित केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी सामंथाचे कौतुक करायला सुरुवात केली आहे. तर काहींनी जे लोक महिला रिपोर्टरला त्रासदेत आहेत, असले प्रकार सहन केले जाऊ नयेत असं देखील म्हणत आहेत. या घटनेचा व्हिडीओ nflmx नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर तो आतापर्यंत २६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.