scorecardresearch

Guinness : जगातील सर्वात उंच पाळीव मांजराची गिनीज बुकमध्ये नोंद, पाहा व्हिडिओ..

एका पाळीव मांजराची त्याच्या उंचीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या मांजराची उंची १८.८३ इंच इतकी आहे. हा दोन मांजरींच्या उंचीच्या बरोबरीचा हा माप आहे.

Guinness : जगातील सर्वात उंच पाळीव मांजराची गिनीज बुकमध्ये नोंद, पाहा व्हिडिओ..
फेनरीर मांजर (Source: Guinness World Records.com)

एका पाळीव मांजराची त्याच्या उंचीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या मांजराची उंची १८.८३ इंच इतकी आहे. हा दोन मांजरींच्या उंचीच्या बरोबरीचा हा माप आहे. फेनरीर असे या मांजराचे नाव आहे. यूएसमधील मिशीगन येथील डॉ. विलियम जॉन याचे हे मांजर आहे.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, हे मांजर पाळीव मांजर आणि सर्व्हल जी आफ्रिकेतील मांजर आहे यांच्यातील क्रॉस ब्रिड आहे. एका जंगली मांजरी सारख्या प्राण्याचे वंशज असूनही फेनरीर त्याच्या ब्रिडच्या तुलनेत खूप मोठा आहे. फेनरीर सरासरी आकाराच्या सवाना मांजरीपेक्षा एक इंच उंच आहे. सवाना मंजरीची उंची ही १४ ते १७ इंच इतकी असते. Guinness World Records ने या मांजराचा व्हिडिओ शेअर केला आहे.

(Viral : तेल काढण्यासाठी पठ्ठ्याची भन्नाट युक्ती, बर्फाचा गोळा तेलात टाकला अन बघा काय झाले..)

१२ आठवड्यांचा असताना दत्तक घेतले

फेनरीर हा १२ आठवड्यांचा असताना विलियम यांनी त्याला दत्तक घेतले होते. लोक फेनरीरला पाहून त्यास छोटा चित्ता, प्युमा किंवा ओसेलोट समजत असे, असे विलियम यांनी गिनीजला सांगितले आहे. तसेच फेनरीरला त्याच्या कर्तुत्वासाठी मान्यता मिळाल्याने हायब्रिड मांजरीबद्दल जगाची समज बदलेल, असा विश्वास फेनरीर यांनी व्यक्त केला आहे.

मांजरीच्या आंगावर चित्त्याच्या शरिरावर असतात तसे ठिपके आहेत. त्यामुळे ते बेबी चित्ता असल्याचे वाटते. तसेच त्याचे शरीर देखील भारी असल्याचे व्हिडिओतून दिसून येते. व्हिडिओमध्ये इतर मांजरीही दाखवण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या