एरव्ही लोक फास्ट फूड खूप खातात. यात तेलाचे प्रमाण अधिक असते. अन्न पदार्थातील तेलाचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक असल्यास ती शरिरासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे, तेलाचा वापर कमी करायला हवा. तेलाचे प्रमाण कमी करण्याशीच संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने खाद्य पदार्थातील तेल काढण्यासाठी भन्नाट जुगाड केला आहे.

अशा प्रकारे तेल काढण्यासाठी बर्फाचा वापर होतो, असे कॅप्शन देत वाला अफशर या ट्विटर युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती खाद्य पदार्थातील गरम तेल बर्फाच्या सहाय्याने काढताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कढाईतील तेल काढण्यासाठी व्यक्ती भन्नाट युक्ती करते. ही व्यक्ती हातात बर्फाचा गोळा घेते आणि तो तेलात बुडवते. तेलातून बाहेर काढल्यानंतर तेल बर्फाला चिकटल्याचे दिसून येते. गोठलेल्या तेलाचे थर नंतर ही व्यक्ती चमच्याच्या सहायाने काढते.

(Viral : वाढदिवसात मुलाने हकनाक खाल्ला मार, बर्थडे बॉयने थेट कानशिलातच लगावली, काय झाले पाहा..)

तेल काढण्याची ही पद्धत खरच आश्चर्यकारक आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १० लाख व्ह्यूज मिळाले आहेत. १६ हजारांपेक्षा अधिक लाईक्स देखील या व्हिडिओला मिळाले आहेत. तेलाचे प्रमाण कमी करण्याचा हा अनोखा प्रयोग नेटकऱ्यांना पसंत पडला आहे. या व्हिडिओवर त्यांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओ पाहून एका युजरने या पद्धतीचा वापर धाब्यावर करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. एका युजरने तर घरी देखील वापर झाला पाहिजे असे म्हटले आहे. तर हा व्हिडिओ पाहून माझे आयुष्य बदलणार असल्याचे एका ट्विटर युजरने म्हटले. तेल काढण्यासाठी केलेला हा जुगाड लोकांना पसंत पडला आहे.