Viral video: सोशल मीडियामध्ये सध्या प्राण्यांचे व्हिडिओ फार लोकप्रिय ठरत आहेत. त्यातही पाळीव प्राण्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. हा व्हिडिओ आहे साप आणि मांजर यांच्यातील संघर्षाचा. साप आणि मुंगुस यांच्या लढाईचे अनेक व्हिडीओ आपण पाहातो. पण साप आणि मांजराच्या लढाईतला व्हिडीओ पाहायला मिळणं फारच दुर्मीळ असतं. काही दिवसांपूर्वी साप आणि मांजर यांच्यातील मैत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये मांजर आणि साप एकत्र झोपले होते. आज साप आणि मांजर यांच्यातील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता साप जात असताना मांजर त्याला अडवते.
सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते, तर काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही.
व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा एका घराच्या कोपऱ्यात सापाने एका बाजूला आपला मोर्चा वळवला आहे. तो कुठल्यातरी बिळात घुसण्याच्या बेतात आहे, तितक्यातच मांजर त्याला डिवचते. शेवटी साप तो. स्वस्थ कसा राहील? त्यानेही मांजराशी झुंज देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले.साप खरंतर विषारी प्राणी. तो मांजराला दंश करून जीवे मारू शकला असता. पण बेधडक, बिनधास्त मांजराने सापाच्या मनात असा विचारही आणू दिला नाही.मांजराच्या वारंवारच्या हल्ल्यापुढे साप जणू हतबल झाला आहे. तो स्वतःमधील हल्ल्याची क्षमता जणू हरवून बसला आहे. तो केवळ मांजरासमोर हल्ल्याची हूल देतोय. पण त्याच्या या दहशतीपुढे मांजर नरमलेली नाही.मांजरीने जशास तसे हल्ले सुरू ठेवत सापाचा बँड वाजवला आहे. त्यामुळेच सोशल मीडियातील व्हिडिओ प्रचंड लोकप्रियता कमावत आहे. मांजराची हीच धमक सोशल मीडियामध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे. अनेक लोक पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DNYVFONzhq_/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर हा व्हिडीओ angelgauri102 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत मांजरीचं कौतुक करत आहेत.