VIRAL VIDEO: लग्नाचा सीजन असो वा नसो, परंतु सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. कधी नवरा त्यांच्या प्रवेशामुळं अधिक व्हायरल होतो, तर कधी नवरी तिच्या प्रवेशामुळं अधिक व्हायरल होते. कधी-कधी लग्नात आलेले पैपाहुणे सुध्दा लोकांचं अधिक मनोरंजन करतात. लग्नात काहीवेळेला चांगले आणि वाईट असे दोन्ही पद्धतीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे सगळं पाहून त्यांना हैराणी सुध्दा होऊ शकते आणि हसू सुध्दा येऊ शकतं. लग्नामध्ये एखादी गोष्ट कमी झाल्यावर मानापमानाचे नाट्य नेहमी होत असते. कधीकधी यावरुन वाद होऊन लग्नही मोडल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण, आग्रा शहरात झालेल्या लग्नात शुल्लक कारणाचे मोठ्या वादात रुपांतर झाले आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

काही नातेवाईक आणि पाहुणे एका लग्न समारंभासाठी आले होते. हे सर्व लोक टेबलावर बसून आरामात जेवत होते. तेवढ्यात एक व्यक्ती आला आणि त्याने टेबलावर जेवण करत बसलेल्या व्यक्तीची टोपी फेकली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली.त्यानंतर बाचाबाचीला सुरुवात झाली अन् त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. टोपी फेकल्यानंतर त्या व्यक्तीने बसलेल्या व्यक्तीच्या गालावर चापट मारली, त्यानंतर लोकांचा राग अनावर झाला आणि दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू झाली. यावेळी टेबलवरचे जेवण खुर्चा सगळ्याचं नुकसान झालं, उपस्थित लोकांनी मिळेल त्याने एकमेकांना मारायला सुरुवात केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: मित्रासोबत भयंकर मस्करी; मित्राला टायरमध्ये बसवून उतारावरुन ढकललं, नंतर जे घडलं ते थरकाप उडवणारं

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्विटरवरती हा व्हिडीओ @SabjiHunter नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अधिक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकं विविध पद्धतीच्या कमेंट करीत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करीत असताना लिहिलं आहे की, कुस्तीची मॅच अधुरी राहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.