‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीला साजेसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणाला दोन वाहनांनी धडक दिल्यानंतरही तो सुखरुप असल्याचं पाहायला आहे. खरं तर, भारतातील बहुतांश रस्ते अपघातांमागे वाहतुकीचे नियम न पाळणे हेच कारण असते. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी पोलिसांकडून दंडाची रक्कमही वाढवण्यात आली आहे, तरीही अनेक लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. सध्या राजस्थानमध्ये अशीच एक घटना घडली, ज्यामध्ये एक व्यक्ती दोनदा मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचं पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील नोखा तहसील रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये चुकीच्या दिशेने येणाऱ्या पिकअपने बिकासर गावातील २० वर्षीय किशन गिरी नावाच्या युवकाला जोरात धडक दिली. या धडकेमुळे तो जोरात हवेत उडून जमिनीवर पडल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- लिफ्टमधून कुत्र्याला नेणाऱ्या महिलेला माजी IAS ची मारहाण; नवऱ्याने घेतला बदला, घटनेचा VIDEO होतोय व्हायरल

पिकअपला धडकताच समोरुन आला ट्रॅक्टर –

व्हिडीओत पुढे दिसत आहे की, जमिनीवर पडल्यानंतर पिकअपच्या बाजूने येणारा ट्रॅक्टर किशनच्या हातावर जातो. ट्रॅक्टरचा वेग जास्त असल्यामुळे चालकाला त्यावर नियंत्रण ठेवता न आल्याने तो किशनच्या हातावरुन गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे किशनची दोन वेगवेगळ्या वाहनांशी धडक होऊनही त्याचा जीव वाचला आहे. ट्रॅक्टरची धडक बसल्याने किशनच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला बिकानेर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलं असून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किशन त्याच्या मित्रांना सोडल्यानंतर परत येत असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या पिकअपला त्याची धडक बसली आणि काही क्षणातच तिथून जाणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला धडक दिल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाला. पिकअपची धडक आणि ट्रॅक्टर येण्यामध्ये सुमारे पाच सेकंदांचे अंतर होते. तरीही किशनचा जीव सुदैवाने वाचला आहे. सध्या या भयंकर अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.