scorecardresearch

‘या’ शहरात सुरु झाले पहिले ट्रान्सजेंडर सलून, जाणून घ्या काय आहे खासियत

या पहिल्या ट्रान्सजेंडर सलुनला आता ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

first transgender salon opened in mumbai
'या' शहरात सुरु झाले देशातील पहिले ट्रान्सजेंडर सलून, जाणून घ्या काय आहे खासियत (photo – freepik)

ट्रान्सजेंडर अर्थात तृतीयपंथी समाजातील लोकांना आजही तितकात भेदभाव केला जातो. शतकानुशतके ही लोकं खूप काही सहन करत आली आहेत. या समाजाला ना सरकारी नोकरीत आरक्षण दिले जाते, ना कुठल्या योजनेत सवलत दिली जाते. त्यामुळे ते स्वत:च्या अस्तित्वासाठी आणि समान हक्कांसाठी वर्षोनुवर्षे लढा देत आहेत. या लढ्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. अशा परिस्थितीत सर्व ठिकाणी या समाजाला नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. पण या सर्व अडचणींचा सामना करत ट्रान्सजेंडर समाज वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवत आपले भविष्य घडवत आहेत. अलीकडेच ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने मुंबईत देशातील पहिले ट्रान्सजेंडर सलून सुरु करण्यात आले आहे.

मुंबईतील हे सलून ७ ट्रान्सजेंडर व्यक्ती चालवतात. या अनोख्या सलूनच्या मालक जैनब स्वत: ट्रान्सजेंडर समुदायातील आहे. याबाबत जैनब म्हणाल्या की, हे सलून उघडणे खूप महत्त्वाचे होते, कारण यातून ट्रान्सजेंडर समाजातील व्यक्तींना सशक्त आणि स्वावलंबी बनवण्याचा माझा उद्देश आहे.

या सलूनमध्ये ट्रान्सजेंडर समुदायातून येणाऱ्या लोकांना प्रशिक्षणासह कामही दिले जाणार आहे. ज्यामुळे भविष्यात ते सन्मानाने आपले आयुष्य जगू शकतात. जैनब यांना हे सलून सुरु करण्यासाठी Deutsche Bank आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांनी मदत केली. यामुळे त्या सलून सुरु करु शकल्या.

हे सलून सुरु झाल्याने ट्रान्सजेंडर समाजातील इतर लोकांना त्यांचे स्टार्टअप सुरु करण्याची एक प्रेरणा मिळेल, यासोबतचं या समाजातील लोकांना स्वावलंबी बनवण्याची प्रेरणा मिळेल. यानिमित्ताने ज्या समाजात ट्रान्सजेंडर समुदायाला खूप वेगळे आणि उपेक्षित मानले जाते. तो समाज भविष्यात मोठी झेप घेऊ शकेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 18:28 IST

संबंधित बातम्या