Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही व्हिडीओ पाहून हसू येतं तर काही व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी येतं. मात्र काही व्हिडीओ असेही असतात जे विचार करायला भाग पाडतात. अशाच एका माशाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतच राहतात आणि ते आलेही पाहिजेत. नाहीतर जगण्याला कारणच उरणार नाही. त्यामुळे, ही वेळ जर तुमच्या आयुष्यात अपयश घेऊन आली असेल, तर वाईट वाटून घेऊ नका, कारण अपयशातूनच यशाकडे जाणारा मार्ग दिसणार आहे. फक्त संयम ठेवा. योग्य वेळेची वाट बघा. यश एका रात्रीत मिळत नाही आणि मिळालेच, तर टिकत नाही.
प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. परंतु, जिथे प्रयत्न संपतात, तिथे देवावर आणि दैवावर भार टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच उरत नाही. जो प्रयत्न करतो, त्याला परमेश्वर साथ देतो. म्हणून प्रयत्नांती परमेश्वर म्हटले आहे. कोणत्याही अवघड परिस्थितीत आपण प्रयत्नच केले नाहीत, ही खंत मनात राहता कामा नये. यासाठी आधी प्रयत्न करा, बाकी परमेश्वरावर सोपवा, जसे या छोट्याशा माशानं सोपवले.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाण्याच्या बाहेर मासे पकडण्याच्या जाळीत मासे पकडलेले आहेत. सर्व मासे जिवंत असून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच एक मासा प्रचंड धडपड करताना दिसत आहे. तो जीव वाचवण्यासाठी आणि पाण्यात जाण्यासाठी प्रयत्न करतोय. अखेर तो त्या जाळीतून बाहेर येतो आणि पाण्यात जातो. प्रयत्न केले आणि तो बचावला, मात्र त्यानं प्रयत्नच केले नसते तर त्याचा इतर माशांसारखे जाळीतच मृत्यू झाला असता. हा व्हिडीओ प्रयत्नांती परमेश्वर याचं उत्तम उदाहरण आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ dream_vardi नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या घटनेने हे सिद्ध केले आहे की कधीही हार मानू नये. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “देव तारी त्याला कोण मारी” तर आणखी एकानं, “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं लिहिले, “जगण्याची इच्छा प्रत्येक सजीवात असते.” आणखी एकाने म्हटले, “शेवटी तो बचावला याचा खूप आनंद झाला.