Fisherman Catches Giant Anaconda: अमेझॉनच्या जंगलांमधून वेळोवेळी समोर येणाऱ्या विशाल अॅनाकोंडाचे व्हिडीओ नेहमीच लोकांना चकित करीत असतात. कधी हिरवट रंगाचा अजस्र साप नदीतून झुलत येतो, तर कधी काळसर अॅनाकोंडा झपाट्याने पाण्यातून पसार होतो. असा कोणताही प्रसंग समोर आला, तर अंगावर काटा यावा, अशी भीतीदायक दृश्यं सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
अमेझॉनच्या रहस्यमय जंगलांमध्ये असंख्य जीवसृष्टी वावरते; पण जेव्हा समोर उभा राहतो एक अजस्र, काळा अॅनाकोंडा, तेव्हा धडधड वाढते आणि श्वास अडकतो. असाच एक थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जिथे एक मासेमार नदीतल्या पाण्यात झुलणाऱ्या अॅनाकोंडाच्या शेपटाला हात घालतो. सामान्य माणूस तिथे असता, तर तिथून जीव मुठीत घेऊन पळाला असता; पण इथे उलटंच घडलं. मासेमाराच्या हातात सापडलेली शेपूट… आणि तीच शेपूट सोडवण्यासाठी धडपडणारा तो अजस्र साप हा सामना पाहणं म्हणजे मृत्यूच्या दाराशी उभं राहणं. पण, या संघर्षाचा शेवट काय झाला? साप उलटला की माणूस सुटला? हा VIDEO सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय आणि ज्याने पाहिला, त्याच्या अंगावर एखादा तरी शहारा आला असेलच.
असाच एक थरारक VIDEO सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये एक मासेमार नदीत आपल्या होडीवर उभा असून, त्याने एका भल्यामोठ्या काळ्या अॅनाकोंडाच्या शेपटाला पकडलेले दिसते. ही कृती किती धोकादायक आहे हे त्या क्षणांतील हालचालींवरून स्पष्ट होते. कारण- अॅनाकोंडा पूर्ण ताकदीनिशी धडपडत सुटण्याचा प्रयत्न करीत असतो.
काय दिसतं या व्हिडीओत?
व्हिडीओमध्ये मासेमार आपल्या होडीवरून पुढे झुकून त्या अजस्र सापाच्या शेपटाला घट्ट पकडतो. पाण्यात झपाट्याने हालचाल करीत असलेला अॅनाकोंडा त्या पकडीतून सुटण्यासाठी जोर लावतो. काही क्षणांनंतर मासेमार शेवटी त्याला सोडून देतो आणि तो साप झपाट्याने नदीकिनाऱ्याच्या दिशेने जाऊन झाडीत लपतो. हा प्रसंग पाहताना हृदयाचे ठोके चुकतात. कारण- समोर असलेला साप कुठल्याही क्षणी उलटून हल्ला करू शकतो, अशी दाट शक्यता जाणवते.
लोकांच्या प्रतिक्रिया?
हा VIDEO @TerrifyingNature या एक्स (Twitter) हँडलवरून शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत त्याला तीन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अनेकांनी थरकाप झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एकानं लिहिलं, “सुदैवाने सोडून दिलं, नाही तर बचाव शक्य नव्हता”, दुसरा म्हणतो, “माणसांनी निसर्गाला असह्य करून टाकलंय”, तिसरा म्हणतोय, “साप वाटत नाही, मासा वाटतो”, चौथा म्हणतोय, “मी फक्त व्हिडीओ पाहूनच घाबरलो, समोर असतो, तर काय झालं असतं कुणास ठाऊक.”
येथे पाहा व्हिडीओ
एकूण काय, तर हा VIDEO पाहताना श्वास रोखल्यासारखी अवस्था होते. जर तुम्ही अजून पाहिला नसेल, तर नक्की पाहा, कारण हा साप तुमच्या कल्पनेपेक्षाही मोठा आणि धोकादायक आहे.