सामान्यपणे नवजात बाळाचे वजन ६ ते ७ पाउंड म्हणजेच ३ ते ४ किलो इतके असते. काही वेळा ते ९ पाऊंडपर्यंत असू शकते. मात्र फ्लोरिडामध्ये एका महिलेने तब्बल १३ पाउंडच्या बाळाला जन्म दिला आहे. आता हे बाळ इतके वजनदार कसे काय याबाबतच्या चर्चांना उधाण आले असले तरीही यातील आनंदाची बाब म्हणजे आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. १३ पाउंड म्हणजे हे बाळ ५ किलोहून अधिक वजनाचे आहे. ही गोष्ट खरी वाटत नसली तरीही फ्लोरीडामध्ये हे प्रत्यक्षात घडले आहे.
ख्रीस्टीन कॉर्बिट हिने मुलीला जन्म दिला असून तीची तब्येत चांगली आहे. याबाबत कॉब्रेट म्हणाली, ‘पोट सुरुवातीपासूनच खूप मोठे असल्याचे मला जाणवत होते. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मी डॉक्टरांकडे गेले आणि सिझेरीयन करुन घेतले. डॉक्टर शस्त्रक्रिया करत असताना बाळ आपल्या पोटातून चालतच बाहेर येत असल्याचे वाटत होते.’
… आणि ती बनली राज्यातली पहिली तृतीयपंथी HR Executive
ख्रीस्टीनचा नवरा लॅरी याबाबत म्हणाला, ‘आमच्याकडे असणारा डायपर बाळाला बसत नव्हता, कारण ती ३ नंबरच्या डायपरच्या साईझची होती. बाळाच्या प्रतूतीची तारीख २० ते २१ मे च्या दरम्यानची होती. मात्र ही प्रसूती १५ मे रोजीच झाली. आमची मुलगी अतिशय सुंदर आहे’ असे या दोघांनीही सांगितले.
आमची याआधीची बाळं ९ आणि १० पाउंडची होती. त्यामुळे हे बाळही १० पाउंडपर्यंत असेल असे वाटले होते. मात्र या १३ पाउंडच्या बाळाने आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो आहोत. या बाळाचे नाव कार्लिग ठवले असून त्याला जन्मल्यानंतर काही काळ लहान मुलांसाठी असणाऱ्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तिचे रक्त आणि रक्तातील साखर यांचे प्रमाण तपासल्यानंतर तीचे आरोग्य चांगले असल्याचे जाहीर कऱण्यात आले.