जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या विश्वविक्रमाने सर्वांना चकित केले आहे. कुणी टी-शर्टची घडी घालून विश्वविक्रम केला आहे, कुणी बर्गर खाऊन, कुणी खूप फिरून तो विक्रम केला आहे. हे सर्व रेकॉर्ड्स असे आहेत की ते खूप युनिक आहेत. यातील अनेक नावे अशी आहेत की त्यांचे काम पाहून तुम्हाला धक्का बसेल. अशा एका अनोख्या विश्वविक्रमाची निर्मिती करणाऱ्या अशाच एका व्यक्तीची हल्ली खूप चर्चा होतेय. नुकताच असाच एक विश्वविक्रम फ्रान्सच्या जोनाथन व्हेरोने केला आहे.

जोनाथन व्हेरोने याने स्वतःला पेटवून त्याने सर्वात वेगवान १०० मीटर शर्यत पूर्ण केली. तुम्हाला हे जाणून आणखी आश्चर्य वाटेल की त्याने ऑक्सिजन सिलिंडरचाही मदत घेतली नाही. गिनीज बुकने त्याची माहिती दिली आहे. ३९ वर्षीय फ्रेंच अग्निशामक जोनाथन व्हेरो याने ऑक्सिजनशिवाय सर्वात लांब अंतर पूर्ण बॉडी बर्न रन करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. जोनाथन व्हेरो याने या पूर्वीचाही विक्रम मोडला आहे. जोनाथनने ऑक्सिजनशिवाय सर्वात वेगवान फुल बॉडी बर्न १०० मीटर स्प्रिंटचा विक्रमही मोडला. या पूर्वीचा १७ सेकंदाचा विक्रम मोडत त्यानं ७.५८ सेकंदांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी हे दोन्ही विक्रम ब्रिटनच्या अँटोनी ब्रिटनच्या नावावर होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – गाडीच्या पत्र्यामध्ये अडकलं कुत्र्याचं डोकं; पोलिसांनी वाचवले प्राण, रेस्क्युचा Video व्हायरल

जोनाथनने त्याचा सुंदर फोटोही शेअर केला आहे. गिनीज बुकने लिहिले की, “आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम फोटोंपैकी हा एक आहे.ऑक्सिजनशिवाय सर्वात लांब अंतराच्या फुल बॉडी बर्न रेसचा विक्रम खूप कठीण आहे. असे असूनही २००९ पासून हा विक्रम सात वेळा मोडला गेला आहे. ब्रिटनच्या कीथ माल्कमने १४ वर्षांपूर्वी पहिल्यांदा हा विक्रम केला होता. जोनाथन त्याच्यापेक्षा तीनपट वेगाने धावला.”

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! तुम्हीही रेल्वेतील चहा पिता का? हा Video पाहून कधीच हात नाही लावणार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशामक असण्यासोबतच जोनाथन एक व्यावसायिक स्टंटमॅन देखील आहे. तो म्हणाला, मला आगीशी खेळण्याची नेहमीच आवड होती. म्हणूनच लहानपणापासून आजतागायत मी त्याच्याशी खेळणे सोडलेले नाही. तो आपला बहुतेक वेळ आग विझवण्यात किंवा फायर शोमध्ये भाग घेण्यात घालवतो.