scorecardresearch

Premium

Viral Video: मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! दोस्ताला मृत्यूच्या दारातून खेचलं, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

Viral video: “जिथे मित्र सोबत आहेत, तिथे यमरजालाही रिकाम्या हातानं परतावं लागतं”

friends saved the man life when car was about to fall into a deep ditch watch shocking video
दोस्ताला मृत्यूच्या दारातून खेचलं,

दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल मित्रा जिंकलस!

सोशल मीडियावर अनेकवेळा हृदय पिळवटून टाकणारे व्हिडिओ समोर येतात. असे व्हिडिओ भावनिक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही मित्र आपल्या मित्राला मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यांच्या मित्रांचे कौतुकही करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

how to install dashcam in car
Car tips : गाडीमध्ये ‘डॅश-कॅम’ कसा लावावा? या चार सोप्या स्टेप्स करतील तुमची मदत
Gondia, Tragic Accident, Car Veers, Canal, Three Killed, Pangaon, Salekasa,
गोंदिया : भाविकांची अनियंत्रित कार कालव्यात कोसळली; तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू
kuno three cheetah cubs marathi news, kuno cheetah project marathi news, cheetah marathi news
विश्लेषण : कुनोतील चित्त्यांचे बछडे यंदा तरी जगतील का? अजूनही कोणती आव्हाने?
throws puppy noida
संतापजनक! सात वर्षांच्या मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला २० फुटावरून फेकलं, FIR नंतर रहिवाशांचे आंदोलन

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कार खोल खड्ड्यात पडायच्या स्थितीत आहे. रस्त्याच्या पलिकडे कार पडली मात्र ती एका दगडावर जाऊन अडकली. यावेळी कारमध्ये असणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी इतर मित्र प्रयत्न करत आहेत.तो माणूस गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांच्या मदतीने तो माणूस गाडीतून बाहेर पडण्यात यशस्वी होतो. त्याचवेळी गाडी खोल दरीत कोसळते. मित्रांनी कारमध्ये अडकलेल्या तरुणाला मृत्यूच्या दारातून खेचलं म्हणायला हरक नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @HasnaZaruriHai नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे, जो आतापर्यंत ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वावर हाय तर पॉवर हाय! रुबाबात बैलगाडी हाकत वऱ्हाड घेऊन निघाला नवरदेव; VIDEO व्हायरल

या व्हिडीओला कॅप्शनही देण्यात आलं आहे, “जिथे मित्र सोबत आहेत, तिथे यमरजालाही रिकाम्या हातानं परतावं लागतं” दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या भावनिक कमेंट केल्या आहेत. तर असा मित्र सगळ्यांकडे असावा अशा कमेंट लोक करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Friends saved the man life when car was about to fall into a deep ditch watch shocking video srk

First published on: 08-12-2023 at 16:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×