Funny Answer Sheet: परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात महत्वाचा भाग असतो. या परीक्षेत विद्यार्थी अनेक वेळा विचारलेल्या प्रश्नांना चमत्कारीक उत्तर देत असतात. सध्या सोशल मीडियावर एका उत्तर पुत्रिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही उत्तर पत्रिका वाचून तुम्हालाही धक्का बसणार आहे. तुम्हाला हासावे की खेद व्यक्त करावा, हे समजणार नाही. या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे. या विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत असा काही डायलॉग लिहिला की शिक्षक ही त्याला ८० पैकी ८० गुण देण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या मजेदार उत्तरपत्रिका व्हायरल होत असतात. ज्यात विद्यार्थी असं काही लिहितात, ज्याबाबत कुणी कल्पनाही केलेली नसते. अशीच एक उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे. ज्यात असं काही लिहलंय की, जे वाचून तुमचंही डोकं चक्रावून जाईल.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक शिक्षक विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासत आहे. ते व्हिडिओ करणाऱ्याला जवळ बोलवून उत्तरपत्रिकेवर फोकस करायला सांगतात. ते म्हणतात, “या विद्यार्थ्याने आतापर्यंतचे सगळे प्रश्न बरोबर सोडवले आहेत. हा शेवटचा प्रश्न आहे आणि हेही उत्तर बरोबर आहे!” आता तुम्ही म्हणाल सगळी उत्तरं बरोबर लिहल्यावर शिक्षक गुण देणारच ना… मात्र, खरी गंमत पुढेच आहे. शिक्षकाने शेवटच्या पानावर लिहिलेला डायलॉग वाचला, जो आश्चर्यचकीत करणारा होता. विद्यार्थ्याने लिहिले होते, “जिंकण्याची मजा तेव्हाच येतो, जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट बघत असतात.” हा डायलॉग पाहून शिक्षक इतके प्रभावित झाला की त्यांनी जराही वेळ न घालता विद्यार्थ्याला ८० पैकी ८० गुण देऊन टाकले!

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/Prof_Cheems/status/1887876596713078981

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Prof_Cheems नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. ही पोस्ट हजारो जणांनी पाहिली असून त्याला लाइक केले आहे. त्यावर अनेक प्रकारच्या कॉमेंट आल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, भविष्यातील आयएएस अधिकारी. दुसरा म्हणतो, असे कितीतरी विद्यार्थ्यांकडून यांनी लाच घेतली असेल.