Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. ट्रकच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून हे सगळे ट्रक पुण्याचेच आहेत की काय असाही प्रश्न पडतो.‘मेरा भारत महान’ आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान अशाच एका गाडीच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे जी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. यावेळी सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून या पठ्ठ्यानं गाडीच्या मागे भन्नाट मेसेज लिहला आहे.

देशात आजकालच्या तरुणांमध्ये सरकारी नोकरीची प्रचंड क्रेझ आहे. प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. मात्र आता सरकारी नोकरी मिळवणं प्रचंड कठीण झालं आहे. सरकारी नोकरीसाठी स्पर्धा खूप जास्त आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि टॅलेन्टची गरज असते. त्यात अगदी काही जागांसाठी शेकडो उमेदवार अर्ज करत असतात. त्यामुळे आधी परीक्षा घेण्यात येते आणि त्यानंतर नियुक्ती करण्यात येते. अशीच सरकारी नोकरी मिळवू न शकलेल्या तरुणानं आपल्या गाडीच्य मागे लिहलंय की, “नाय भेटली नोकरी सरकारी म्हणून चालु केली तरकारी” एवढंच नाही तर टायवर लावलेल्या पाटीवर मालकानं, आपलेच गद्दार म्हणत टोलाही लागवला आहे. असो मात्र सरकारी नोकरी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा या व्यक्तीनं स्वत:चा व्यायसाय करण्याचा निर्णय घेतला.

पाहा काय लिहलं नेमकं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.