लग्न समारंभात प्रत्येक नवरी-नवरदेव आपल्या हटके स्टाईलने एन्ट्री करत लोकांचं मन जिंकत असतात. लग्नात नवरी-नवरदेव डान्स परफॉर्मन्स सादर करत रिसेप्शन एन्ट्रीचा हल्ली एक ट्रेंड निर्माण झालाय. पण काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अनेकदा नवरी-नवरदेवांना लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा नवरी आणि नवरदेवाच्या डान्सचा आहे. या व्हिडीओमध्ये ही नवी जोडी मजेदार डान्स करतेय. उत्साहाच्या भरात नवरी-नवरदेवाचा डान्स पाहून तर नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत.

सोशल मीडियावर एका रिसेप्शन पार्टीतला एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात नवरी-नवरदेव शानदार डान्स करताना दिसत आहेत. त्यांना एकमेकांच्या कंपनीशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची पर्वा नाहीये. दोघांच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. त्याच्या शेजारीच काही मित्र आणि नातेवाईकही उभा आहेत. जे त्याचा उत्साह वाढवत आहेत. नवरीदेखील डान्सच्या बाबतीत नवरदेवापेक्षा कमी नाही. उत्साहाच्या भरात नवरी थेट नवरदेवाच्या पाठीवर जाऊन बसते. परंतु त्यानंतर जे काही घडतं, ते पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही.

या व्हिडीओमध्ये जेव्हा नवरी नवरदेवाच्या पाठीवर उडी घेऊन बसते, त्यावेळी नवरदेवाचा तोल जातो आणि सर्वांसमोर ते दोघे जाऊन धाडकन खाली तोंडावर पडतात. त्यानंतर आजुबाजूच्या सर्वांना कोणाला हसू आवरत नाही. हा मजेशीर व्हिडीओ फक्त इथेच संपत नाही. खाली पडूनही नवरी पुन्हा तितक्याच जोशात उठते आणि पुन्हा डान्स करू लागते. आपल्यासोबत नवरदेवही पडला आहे आणि त्याला काही इजा तर पोहोचली नाही ना, याचं सुद्धा आनंदाच्या भरात नवरीला भान राहत नाही.

आणखी वाचा : स्वप्न म्हणा की सत्य.. पण निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पाहून तुम्हीही म्हणाल Wow!

 

View this post on Instagram

 

A post shared by hepgul5 (@hepgul5)

आणखी वाचा : अवघे पाऊणशे वयमान! ७३ वर्षांच्या आजोबांचं कसब पाहून नेटिझन्स झाले अवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही केला आहे.