Gautami Patil Gifts: गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. टीका असो वा कौतुक गौतमीचं नाव घेणं कोणीच सोडलेलं नाही. अलीकडेच अजित पवारांनी सुद्धा गौतमी पाटील वरून केलेली टीका वजा मस्करी चर्चेत होती तर त्यापूर्वी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सुद्धा गौतमीच्या डान्सवर ताशेरे ओढले होते. या सगळ्या टीकाकारांना गौतमीने एका मुलाखतीत उत्तर देत, “तुम्ही मला एकाच चुकीवर बोलत आहात, मी चुकले पण नंतर मी माझी चूक सुधारली, माझ्यातील चांगला बदल तुम्ही का दाखवत नाही?” असा पलटवार केला होता. या मुलाखतीमधून गौतमीची एक वेगळीच बाजू लोकांना पाहायला मिळाली अशाही कमेंट या व्हिडीओवर केलेल्या होत्या. आणि आता त्यानंतर एक एक करून गौतमीवर गिफ्ट्सचा वर्षाव होत आहे.

गौतमी पाटीलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे गिफ्ट्सचे फोटो शेअर करत आपल्या फॅन्सचे आभार मानले आहेत. गौतमीच्या चाहत्यांनी तिला वेगवेगळ्या लुकमधील चित्र व फोटो तसेच पेंटिंग्स काढून भेट दिली आहे. या सगळ्यांना धन्यवाद म्हणत गौतमीने फोटो शेअर केले आहेत. तर या पोस्टवर सुद्धा काहींनी मी तुझ्यासाठी फोटो,चित्र नाही पण कविता करू शकतो, तुझ्यावर निबंध लिहू शकतो असे म्हणत कमेंट्स केल्या आहेत.

गौतमी पाटील गिफ्ट कलेक्शन

हे ही वाचा<< गौतमी पाटीलने पहिल्यांदा सांगितला लग्नाचा प्लॅन! म्हणते, “त्याच्याशी लग्न करेन कारण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौतमीने एका मुलाखतीत आपल्या चाहत्यांबद्दलही भाष्य केले होते. टीकाकारांएवढेच माझे फॅन्स आहेत. त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. तुम्ही मला कॉल, मेसेज करत असता पण नेहमी उत्तर देणं शक्य होत नाही. पण माझंही तुमच्यावर प्रेम आहे त्यामुळे एक नव्हे तर १०० व्हिडीओ कॉल केले तरी हरकत नाही असे गौतमी म्हणाली होती.