Gautami Patil Lavani Viral Video: पुण्यातील लोणी काळभोर येथील दहीहंडी दरम्यान रिल्स स्टार गौतमी पाटील या तरुणीने अश्लील डान्स केल्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती.त्यानंतर तिने सर्वांसमोर येऊन जाहीर माफी देखील मागितली होती.आता गौतमी पाटील हिच ‘सरकार तुम्ही मार्केट केलय जाम’ हे गाण रसिक प्रेक्षकांना पुन्हा भुरळ घालत आहे. अलीकडेच गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणावरून स्वतः गौतमी पाटीलनेच पुढे येऊन आपला अनुभव शेअर केला आहे.

गौतमी पाटील हिने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, मी सोशल मीडियावर माझे डान्स व्हिडीओ शेअर केल्यापासून मला शो साठी विचारणा होऊ लागली. अशातच दहीहंडीच्या कार्यक्रमात माझ्याकडून अश्लील स्टेप झाल्या ज्यावरून मी क्षमाही मागितली, अजूनही मी सर्वांना सॉरी म्हणते.

गौतमीने यावेळी आपल्या मिरजमधील शो चा धक्कादायक अनुभवही शेअर केला आहे. मिरजच्या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती, यावेळी अतिउत्साही प्रेक्षकांपैकी काहींनी काठ्या फेकून मारल्या. इतकं होऊनही आम्ही कार्यक्रम थांबवला नाही. मिरजच्या कार्यक्रमात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली यावरूनही गौतमीने खेद व्यक्त केला.

गौतमी पाटील लावणी व्हिडीओ

गौतमी पाटीलने पत्रकार परिषदेत आपल्या खाजगी आयुष्याविषयीही काही खास खुलासे केले आहेत. गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. अर्ध्यावरच शिक्षण सोडून तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली.

गौतमी पाटील लावणी व्हिडीओ

गौतमी पाटीलसाठी जीवाशी खेळ? तरुणांना वेड लावणारी गौतमी खऱ्या आयुष्यात कशी आहे, पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमीने सुरुवातीच्या काळात एका लावणी ग्रुपमध्ये सहभाग घेतला होता. पहिल्यांदा अकलूज येथील लावणी महोत्सवात बॅक आर्टिस्ट म्हणून गौतमीने सादरीकरण केले. त्यावेळी अवघ्या ५०० रुपये मानधनात तिने शो केला होता आता काही हजारांमध्ये मानधन घेत असल्याचे गौतमीने सांगितले आहे.