देशात चोरी, घरफोडीचे प्रकार वाढतच चालले आहे. चोरट्यांना पोलिसांचे भय आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान दिल्लीत एका मुलीने एका चोरट्याचा प्रतिकार केला आहे. बदलापूर येथे चोराने एका मुलीचा मोबाइल हिसकण्याचा प्रयत्न केला, मात्र या मुलीने न भिता धाडसाने या चोराचा सामना केला आहे.

पोलिसांनुसार, मुलगी टिकरी येथील रहिवासी असून ती बदरपूर ताजपूर तेकडी भागांत आपल्या मित्राला भेटायला गेली होती. त्यादरम्यान चोराने तिचा मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने धाडस दाखवत त्या चोराला पकडले ज्यामुळे त्याने फोन पाडला. मात्र चोर पळण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी बदरपूर ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

एएनआयच्या ट्विटनुसार ही घटना ४ सप्टेंबरची आहे. व्हिडिओमध्ये मुलीची एका व्यक्तीशी झटापट होताना दिसत आहे. या चोर स्वत:ला मुलीपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र मुलीने त्यास पकडून ठेवले आहे. चोर पळण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, या मुलीच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(VIRAL : हॅलो मुख्यमंत्री साहेब! दुकानदार मला समोसा सोबत डिश आणि चमचा देत नाही, कृपया मदत करा…)