सायकल या वाहनाचा वाहतुकीसाठी किंवा मैदानी खेळांसाठीही उपयोग करण्यात येतो. पण, तुम्ही कधी कुणी सायकल चालवताना दोरी उड्या हा खेळ खेळल्याचे पाहिले आहे का? आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुणी नवरात्रीचा पारंपरिक पोशाख घालून सायकलवर बसून दोरी-उड्या हा खेळ खेळताना दिसली आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हायरल व्हिडीओ महामार्गावरील (Highway) आहे. रस्त्यावर गाड्यांची ये-जा अगदीच कमी आहे. यादरम्यान एक तरुणी महामार्गावर सायकल चालवते आहे. तरुणीने नवरात्रीसाठी खास पारंपरिक पोशाख चणिया-चोळी, दागिने घातले आहेत आणि ती सायकल चालवताना दिसते आहे. पण, खास गोष्ट अशी आहे की, सायकल चालवायला जेव्हा तरुणी सुरुवात करते तेव्हा काही वेळात दोरी हातात घेऊन सायकलवरच दोरी उड्या हा खेळ खेळण्यास सुरुवात करते. तरुणीने हँडल न पकडता, दोन्ही हातांत दोरी पकडली आहे आणि सायकलवर बसून ती दोरी उड्या घेताना दिसते आहे. तरुणी कशा प्रकारे सायकल चालवताना दोरी उड्या खेळते आहे हे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा…काळ बदलतोय भाऊ! दांडिया नाही; तर महिला चक्क तलवारीने खेळतायत गरबा; पाहा Video….

पोस्ट नक्की बघा :

सायकल चालवताना मारल्या दोरी उड्या :

तरुणी सायकल चालवत तिची अनोखी कला दाखवताना दिसली आहे. या व्हिडीओचा शेवट होईपर्यंत तरुणी पायाने सायकलचे पँडल मारत दोरी उड्या खेळते आहे. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तरुणी सायकल चालवत पुढे येते आणि तिच्या हातात दोरी असते. तरुणी अगदी सहजपणे दोरी सायकलच्या पहिल्या चाकाखालून टाकते आणि दुसऱ्या चाकातून गोल फिरवून वर घेते; जसे आपण दोरी उड्या करताना उडी मारून पायाखालून दोरी घेतो अगदी त्याचप्रमाणे. दोरी उड्या हा खेळ खेळण्याची तरुणीची ही अनोखी स्टाईल तुम्ही आजवर कधीच पाहिली नसेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @iamsecretgirl023 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘दोरी उड्या माझ्या स्टाईलमध्ये’ अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे. सायकलवर दोरी उड्या हा खेळ खेळताना पाहून काही जण त्या तरुणीविषयी चिंता व्यक्त करताना दिसले आहेत. तसेच काही जण तरुणीच्या अनोख्या कौशल्याची कमेंटध्ये प्रशंसा करीत आहेत आणि हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.