Viral Video Dog Filter On Dead Dad: सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा लाइफस्टाइल व्हिडिओंचा ट्रेंड आता इतका हिट झालाय की तुमच्याही ओळखीत अशाप्रकारचे चार ते पाच युट्युबर्स तरी नक्कीच असतील. खरंतर आपल्या सारख्याच अडचणींना सामोरा जाणारी अन्य व्यक्ती काय उपाय करते हे पाहायला लोकांना आवडतं. अनेकदा यामुळे दुःखाचे प्रसंग सुद्धा सोशल मीडियावर आवर्जून शेअर केले जातात. काही प्रमाणात यामुळे दुःखात असणाऱ्या एकट्या व्यक्तीला इतरांची साथ मिळू शकते असा विचार केल्यास या व्हिडीओजवर टीका करण्याचे तसे कारण नाही. पण ज्या पद्धतीने हे दुःख मांडलं जातं त्यावरून अनेक गोष्टी ठरत असतात, अगदी टीका होणार की सांत्वन हे सुद्धा! व्लॉगर्स मंडळींनी आतापर्यंत वडिलांच्या श्राद्धाचा मेन्यू ते आजोबांच्या अंत्यसंस्काराचा व्लॉग बनवून अनेकदा रोष ओढवून घेतला आहे पण सध्या व्हायरल होणारा प्रकार हा खरोखरच विचित्र आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुणी तिच्या दिवंगत वडिलांच्या हाराने सजवलेल्या फ्रेमच्या बाजूला उभी असलेली दिसतेय. या मुलीने आपल्या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा ऑन करून ‘कुत्रा’ फिल्टर सुरु केला आहे. या फिल्टरने तिलाच नव्हे तर फ्रेममधील वडिलांना सुद्धा कॅप्चर केलं असून काही सेकंद हा व्हिडीओ तसाच चालू असल्याचे दिसतेय.

Video: दिवंगत वडिलांसह काढायला गेली सेल्फी..

मृत वडिलांच्या फोटोला फिल्टर लावण्यावर नेटकरी म्हणतात..

दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की खोटा इथपासून अनेकांना प्रश्न आहे. पण जर या मुलीने खरोखरच असा व्हिडीओ बनवला असेल तर हा शुद्ध निर्दयीपणा आहे असे काहींनी कमेंटमध्ये लिहिले आहे. नशीब आम्हाला मुलं नाहीत, हे किती क्रूर आहे असं काहींनी कमेंटमध्ये म्हटल्याचे दिसतेय. तर एकाने यावर प्रतिक्रिया देताना कदाचित तिला तिच्या वडिलांसह खेळताना, मजा करतानाचा क्षण पुन्हा जगायचा असेल असं म्हणत तिची काहीशी बाजू मांडली आहे. तर सगळं ठीक आहे पण बिचाऱ्या दिवंगत वडिलांच्या फोटोतुन जेव्हा कुत्र्याच्या फिल्टरची जीभ बाहेर येते ते बघणं जरा डोक्यावरूनच जातंय अशी कमेंटही काहींनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. लोकसत्ता. कॉम या व्हिडिओची पुष्टी करत नाही)