देशात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या कोटींवर गेली आहे. मोठेच काय तर लहान मुलांना देखील स्मार्टफोनचे वेड लागले आहे. व्हिडिओ, सोशल मीडिया, गेम्स, सेल्फी आदी कार्य करता येत असल्याने स्मार्टफोन लोकांना प्रचंड आवडत आहे. विशेषत: मुलांना, तरुणांना तर त्याशिवाय रहावतच नसल्याचे चित्र आहे. स्मार्टफोनबाबत असलेले प्रमे कोणत्याही थराला जाऊ शकते याची प्रचिती बंगालमधील एका घटनेतून आली आहे. स्मार्टफोनच्या प्रेमापोटी येथील तरुणीने स्वत:चे रक्त विकण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

बंगालच्या दिनाजपूर येथील १६ वर्षीय तरुणीने स्मार्टफोनसाठी आपले रक्त विकण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी तपान पोलीस हद्दीतील कर्डा या भागातील रहिवाशी आहे. ती १२ व्या वर्गात शिकते. तरुणीने ९ हजार रुपयांचा फोन ऑनलाइन ऑर्डर केला होता. पण तिला तितके पैसे जमवणे कठीण जात होते. मात्र, तिला तो पाहिजेच असल्याने तिने मोठे पाउल उचलले.

(Viral Video : या कावळ्याची चाल पाहून नेटकरी अवाक, फॅशन शोमधील मॉडेललाही टाकले मागे)

तरुणीने फोनसाठी स्वत:चे रक्त विकण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे ती बालुरघाट येथील जिल्हा रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी गेली. रक्ताच्या बदल्यात तिने पैशांची मागणी केली, त्यावरून रुग्णालयातील कर्मचारी सतर्क झाले. त्यांना तरुणीवर संशय आला. रुग्णालयाने तातडीने याबाबत बाल संगोपन विभागाला कळवले. विभागाचे सदस्य तेथे आल्यानंतर त्यांनी चौकशी केली आणि त्यातून पैशे मागण्यामागील कारण माहिती झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्युशन क्लासला जाण्याच्या बहाण्याने तरुणी घरातून बाहेर निघाली होती. मात्र, ती रक्त विकण्यासाठी बस पकडून जिल्हा रुग्णालयात पोहोचली. तरुणीचे वडील स्थानिक बाजारात भाजी विकतात. ती घराबाहेर गेली तेव्हा मी घरी नव्हतो, फोनसाठी ती रक्त विकू शकते, ही कल्पना तिला कोठून आली, याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे तरुणीच्या वडिलांचे म्हणणे आहे. दरम्यान तरुणीला तिच्या आईवडिलांना सोपवण्यात आले आहे.