देशभर होळी सण साजरा करण्यासाठी उत्साहाचे वातावरण आहे. कुठे होलिका दहनची तयारी सुरू आहे तर कुठे रंग खेळण्याची. होळीच्या उत्सवादरम्यान दिल्ली मेट्रोमध्ये असभ्य वर्तन करणाऱ्या दोन मुलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेट्रोमध्ये अश्लील डान्स पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडीओ दिल्ली मेट्रोतील आहे. व्हिडीओमध्ये दोन तरुणी दिसत आहे ज्यांनी पांढऱ्या रंगाचे पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केले आहे. एकीने पांढरी साडी नेसली आहे तर दुसरीने पांढरा ड्रेस परिधान केला आहे. दोघींच्या चेहऱ्याला रंग लावलेला दिसत आहे. या तरुणी रामलीला चित्रपटातील मोहे अंग लगा दे रे…मोहे रंग लगा दे रे या गाण्यावर अश्लील डान्स करताना दिसत आहे. दोघी एकमेकांना रंग लावत आहेत. दोघी एकमेकांच्या अंगावर जाऊन अश्लील डान्स करत आहे. पण, दोघींनाही आपण कुठे आहोत याचे अजिबात भान राहिलेले नाही असे दिसते आहे. दोघींचा अश्लील डान्स पाहून मेट्रोमधून प्रवास करणारे प्रवासी ओशाळले आहेत.

railway pravasi sanghatana expressed anger for running ghatkopar cstm local without home platform
‘होम प्लॅटफॉर्म’ नसताना घाटकोपर-सीएसएमटी लोकल चालवणे गंभीर, लोकलचा विस्तार करण्याचे प्रवासी संघटनेचे मत
Delhi fashion influencer Nancy Tyagi
२० किलोच्या गुलाबी गाऊनमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी नॅन्सी आहे तरी कोण? पाहा व्हायरल फोटो
Metro security guards caught the bicycle thief in Nagpur
नागपूर: मेट्रो सुरक्षारक्षकांनी सराईत सायकल चोराला पकडले
Shubamn Gill Touches Feet of Abhishek sharma Mother Video Viral
IPL 2024: शुबमन गिलने स्टेडियममध्येच अभिषेक शर्माच्या आईला खाली वाकून केला नमस्कार, Video व्हायरल
Accident recorded in Instagram Live Five boys coming to Mumbai in a car
इन्स्टाग्राम Live मध्ये रेकॉर्ड झाला अपघात; कारमधून मुंबईकडे येणाऱ्या पाच तरुणांची हुल्लडबाजी नडली, VIDEO पाहून उडेल थरकाप
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा
Harsh Goenka on Share market predict
‘शेअर मार्केटमध्ये हर्षद मेहताच्या युगाची पुनरावृत्ती’, बड्या उद्योगपतीने गुजराती-मारवडींचा उल्लेख करत वर्तविली भीती
bhandup maternity hospital woman death marathi news
भांडुपमधील प्रसूतिगृहात टॉर्चच्या साहाय्याने महिलेची प्रसूती, अर्भकासह महिलेचा मृत्यू; चौकशीसाठी महापालिकेची समिती स्थापन

सहप्रवाशांनी पाहिलेल्या या घटनेवर ऑनलाइन वापरकर्त्यांकडून तीव्र टीका झाली आहे, ज्यांनी मुलींच्या वर्तन अयोग्य असल्याने निषेध व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त, दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने अशा वर्तनावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा – मैत्री करण्यासाठी हत्तीच्या जवळ गेला तरुण अन् अचानक……पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा!

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्याच्या X खात्यावर व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, “आम्हाला याविरोधात लवकरात लवकर कायदा हवा आहे.” व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक सभ्यतेबद्दल नेटकऱ्यांची चर्चा सुरू झाली. सार्वजनिक ठिकाणी योग्य वर्तन राखण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आणि प्रशासकीय अधिकारी या दोघांच्या जबाबदाऱ्यांबद्दल चर्चा रंगली.

“हा व्हिडिओ पाहून मला लाज वाटते! व्हिडीओमध्ये मागे दिसणाऱ्या लोकांना काय वाटत असेल याची कल्पना करा,” व्हिडिओवर एकाने कमेंट केली केली.

“हे मेट्रो स्टेशन आहे की सिड्यूस (seduced) स्टेशन आहे,” असे म्हणत दुसऱ्याने अश्लील व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

“कोणत्याही कायद्याची गरज नाही. फक्त १ लाख प्रति १५ सेकंदाचे शुल्क पुरेसे आहे,” व्हिडिओवर कमेंट करता तिसऱ्याने लिहिले.

हेही वाचा – Viral Video : भावाच्या लग्नात बहिणींचे झिंगाट नृत्य, तरुणींचा जबरदस्त डान्स एकदा बघाच