प्रत्येक वर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. परंतु, ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक साजरा करायला सुरुवात होते. ७ फेब्रुवारी हा दिवस ‘रोझ डे’ म्हणून साजरा करतात. या दिवशी अनेक प्रेमी आपल्या प्रिय व्यक्तीला गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. रोझ डेच्या दिवशी लाल गुलाबांना प्रचंड मागणी असते. बहुतेकजण आपल्या जोडीदाराला लाल गुलाब देणे पसंत करतात. परंतु यावेळी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी जरा खास आणि वेगळी गोष्ट करू शकता. या रोझ डेला तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या राशीनुसार विविध रंगाचे गुलाब देऊ शकता. यामुळे नक्कीच तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव होईल.
मेष आणि वृश्चिक :
मेष आणि वृश्चिक रास यांचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या व्यक्तींना लाल रंगाचे गुलाब आवडते. त्यामुळेच जर तुमच्या प्रिय व्यक्तीची रास मेष किंवा वृश्चिक असेल तर त्यांना या रोझ डेला लाल रंगाचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करा.
खोटं बोलण्यात पटाईत असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; कधीही देऊ शकतात धोका
वृषभ आणि तूळ :
जर तुमच्या जोडीदाराची रास वृषभ किंवा तूळ असेल तर त्यांना पांढऱ्या किंवा जांभळ्या रंगाचे गुलाब भेट करा. जांभळ्या रंगाचे गुलाब शोधणे कठीण असू शकते. म्हणूनच तुमच्या प्रिय व्यक्तीला पांढऱ्या रंगाचे गुलाब देणे जास्त फायद्याचे ठरेल.
मिथुन आणि कन्या :
मिथुन आणि कन्या राशीच्या व्यक्तींना नारिंगी रंगाचे गुलाब देणे शुभ ठरेल. जर तुमच्या जोडीदाराची रास कन्या किंवा मिथुन असेल तर तर त्यांना नारिंगी रंगाचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करा.
कर्क आणि सिंह :
जर तुमच्या प्रिय व्यक्तीची रास सिंह किंवा कर्क असेल तर त्यांना पिवळ्या किंवा लैव्हेंडर रंगाचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करा. हे रंग सकारात्मकतेचे प्रतीक आहे.
घरात नकोशी असलेली पाल धर्मशास्त्रानुसार असते शुभ, जाणून घ्या
धनु आणि मीन :
धनु आणि मीन राशीच्या व्यक्तींसाठी गुलाबी रंग खास मानला जातो. जर तुमच्या प्रिय व्यक्तीची रास मीन किंवा धनु असेल तर या रोझ डेला त्यांना गुलाबी रंगाचे गुलाब द्यावे.
मकर आणि कुंभ :
या राशीच्या व्यक्तींना आकाशी, निळा आणि जांभळा रंग आवडतो. परंतु या रंगाचे गुलाब मिळणे कठीण आहे. त्यामुळे जर तुमच्या जोडीदाराची रास मकर किंवा कुंभ असेल तर तुम्ही त्यांना निळा, आकाशी किंवा जांभळ्या रंगाचे कोणतेही फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करू शकता.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)