Viral Video: कडाक्याच्या उन्हात घराबाहेर निघणेही नकोसे वाटते. सतत तहान लागणे, अंगावाटे घाम निघणे आदी अनेक गोष्टी उन्हाळ्यात प्रत्येकालाच जाणवतात. नागरिक किंवा प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून काही बस व ट्रेनमध्ये वातानुकूलित सुविधा आहे. तसेच, ओला-उबरचीही वातानुकूलित सेवा उपलब्ध आहे. पण, जर तुम्हाला रिक्षातसुद्धा नैसर्गिकरीत्या वातानुकूलित सुविधेचा आनंद घेता आला तर. ऐकून थोडं नवल वाटलं असेल ना…? तर समाजमाध्यमावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात रिक्षाचालकाने प्रवासी व स्वतःच्या सोईसाठी वातानुकूलित सुविधेपेक्षाही काहीतरी खास अशी सोय केली आहे.

आपण अधिकाधिक झाडे लावली, तर ग्लोबल वॉर्मिंग नक्कीच कमी होईल. पण, त्यासाठी धडपड करणारे फार कमी लोक या जगात आहेत. अशा धडपड्या लोकांपैकीच एक असलेल्या रिक्षाचालकाने त्याच्याकडून याबाबतचा छोटासा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे; जो पाहिल्यानंतर तुमचेही मन आनंदी होईल. रस्त्यावर एक पर्यावरणस्नेही ऑटोरिक्षा दिसून आली आहे. या चालकाने आपल्या रिक्षाला चालत्या-फिरत्या बागेसारखे बनविले आहे. या अनोख्या रिक्षाची एक झलक व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा…प्रवाशांची तारेवरची कसरत; जागा मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालून ट्रेन पकडण्याची धडपड, पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, रिक्षाचालकाने आपले वाहन चालत्या बागेसारखे बनविले आहे. त्या व्यक्तीने त्याची संपूर्ण रिक्षा गवताने आच्छादित केली आहे. त्याशिवाय रिक्षाच्या छतावर लहान फुलांची रोपे लावली असून, उन्हापासून त्यांच्या संरक्षणासाठी जाळीही लावण्यात आली आहे. एवढेच नाही, तर या व्यक्तीने आपल्या रिक्षाचा एक भाग पिंजऱ्यासारखा बनविला असून, त्यात पोपटही ठेवले आहेत. त्यामुळे त्याच्या हिरव्याशार गारेगार रिक्षाला इको पर्यावरणस्नेही, असे म्हटले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वतःसह प्रवाशांचा प्रवास सोईस्कर व दिलासादायक व्हावा यासाठी अनेक रिक्षाचालक वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येतात. या रिक्षाचालकानेसुद्धा पूर्ण रिक्षात ग्रीन कार्पेट, एक्झॉस्ट फॅन, झाडे, अनेक पोपट ठेवून, नैसर्गिक गारेगार रिक्षा तयार केली आहे. प्रवास गारेगार व्हावा म्हणून त्याने लढवलेली ही शक्कल अगदीच कौतुकास्पद व अनोखी आहे, असे म्हणायला हरकत नाही. समाजमाध्यमावर हा व्हिडीओ @fewsecl8r या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा या अनोख्या रिक्षातून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसून आले आहेत.