गुगलवर ‘बेस्ट टॉयलेट पेपर इन वर्ल्ड’ असं सर्च केल्यानंतर पाकिस्तानच्या झेंड्याचा फोटो येत आहे. ट्विटरवरही सध्या #besttoiletpaperintheworld हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. नेटीझन्स गुगलवरील रिझल्ट ट्विटवर पोस्ट करत आहेत. यापूर्वी गुगलवर भिखारी सर्च केल्यास पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो येत होता. तर इडियट सर्च केल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही तज्ञांच्या मते गुरूवारी पुलवामा येथे झालेल्या हल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. एखाद्या व्यक्तीने गुगल अल्गोरिदम किंवा गूगल बॉम्बिंगशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असणार आहे.

 

गुगलचे सर्च इंजिन अल्गोरिदम असे काम करते –
आपण जेव्हा या सर्च इंजिनमध्ये एखादा शब्द टाइप करतो त्याच वेळेस ही संगणक प्रणाली किमान १०० कोटी वा कमाल कितीही अशा शब्दांच्या समूहांना २०० निकषांची चाळणी लावतो. हे दोनशे घटक असतात संदर्भ, लोकप्रियता, कालसापेक्षता, सदर शब्द आधी कोणाकोणाच्या संदर्भात वापरला गेलाय.. वगैरे अनेक. त्यांतनं चाळण लागून मग काही पर्याय समोर येतात. ते जवळपास अचूक असतात. कारण इतके शब्द आणि त्यांच्या छाननीचे निकष याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Google image search shows pakistan flag for best toilet paper in the world
First published on: 16-02-2019 at 17:40 IST