आज काल मोबाईलवर वारंवार स्पॅम कॉल्स आणि एसएमएस येत असतात ज्यामुळे आपल्यापैकी अनेकजण वैतागले आहेत. अनेकांना वाटते की, “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग यामुळे हा त्रास थांबेल,पण याचा वापर सायबर गुन्हेगारही करत आहेत. रोबोकॉल सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हे स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत.”

जर तुम्ही Jio नेटवर्क वापरत असाल, तर MyJio अ‍ॅपच्या मदतीने नको असलेले कॉल्स आणि मेसेजेस ब्लॉक करणे खूपच सोपे आहे. यामध्ये तुम्ही पूर्णपणे स्पॅम कॉल्स ब्लॉक करू शकता किंवा काही जाहिरातींशी संबंधित कॉल्स आणि मेसेजेस स्वीकारण्यासाठी “पार्शियल ब्लॉकिंग” पर्याय निवडू शकता. याविषयामुळेच गुगुलवर सध्या MyJio ट्रेंड होत आहे.

स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस रोखण्यासाठी तुम्हाला Do Not Disturb (DND) सेवा सक्षम करावी लागेल. मात्र, या सेवेच्या मदतीने टेलिमार्केटिंग कॉल्सही ब्लॉक होऊ शकतात.

DND सेवेसोबत, तुम्ही कोणत्या प्रकारचे कॉल्स आणि मेसेजेस ब्लॉक करायचे आहेत, याचेही कस्टमायझेशन करू शकता. बँकिंग, रिअल इस्टेट, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि इतर अनेक पर्याय यात निवडता येतात.

जर तुम्ही “फुल्ली ब्लॉक्ड” पर्याय निवडला, तरीही तुम्हाला सरकारी एजन्सी किंवा सेवा प्रदात्यांकडून येणारे व्यवहाराशी संबंधित कॉल्स/एसएमएस मिळत राहतील.

 google Trend How to permanently block spam calls and SMS on Jio
गुगल ट्रेंड

MyJio अॅपवर स्पॅम कॉल्स आणि एसएमएस बंद कसे करावे?

१) MyJio अ‍ॅप उघडा
२) “More” पर्यायावर क्लिक करा
३) “Do Not Disturb” वर क्लिक करा
४) “Fully Blocked”, “Promotional Communication Blocked” किंवा कस्टम प्रेफरन्स निवडा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

MyJio ॲप उघडा अधिक > Do Not Disturb > वर क्लिक करा आणि “fully blocked” किंवा “promotional communication blocked”हे पर्याय निवडा किंवा आवश्यकतेनुसार सानुकूल प्राधान्य सेट करा.