देशात डिजिटलायझेशनची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे, अशातच सायबर क्राईमच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. इंटरनेटच्या माध्यामातून आजकाल सायबर गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी नवनवीन युक्त्या अवलंबत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे.तुमच्या मोबाईलवरही असा मेसेज आला आहे का? ज्यामध्ये केंद्र सरकार एका खास योजनेअंतर्गत सर्व यूजर्सना 28 दिवसांसाठी मोफत मोबाईल रिचार्ज देणार असल्याचा दावा केला जात आहे. असा मॅसेज आला असेल तर थांबा नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.
वाचा व्हायरल मेसेजमागचे सत्य –
या व्हायरल होणाऱ्या मॅसेजमध्ये केंद्र सरकार ‘मोफत मोबाईल रिचार्ज स्कीम’अंतर्गत 28 दिवसांसाठी सर्व वापरकर्त्यांना 239 रुपयांचे फ्री रिचार्ज देत आहे. मेसेजमध्ये लोकांना रिचार्जसाठी लिंकवर क्लिक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अशा मोफत रिचार्जचा लाभ कधी पर्यंत घेऊ शकाल याची माहितीही मेसेजमध्ये देण्यात आली आहे. दरम्यान PIB ने रिचार्ज प्लॅनच्या मॅसेजची सत्यता तपासून लोकांना सावध केलं आहे. पीआयबीने ट्विट करत अशा मेसेजच्यापाठी वेळ वाया घालवू नका, हा दावा खोटा आहे असं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही.अशीही माहिती दिली आहे.
पाहा ट्विट –
हेही वाचा – शंभर टक्के व्हेज बटर चिकन? मेन्यूचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान अशा फेक मेसेजेसपासून दूर राहा आणि असे मेसेज फॉरवर्डही करु नका असं आवाहन करण्यात आलंय..