Viral Grandma Mall Video: सध्या सोशल मीडियावर एक भावूक करणारा आणि मनाला भिडणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक वयोवृद्ध आजी मॉलमध्ये फेरफटका मारताना दिसतात. मात्र, त्यांचं वागणं पाहून नेटकरी एकदम भावूक झालेत. त्यांच्या एका छोट्याशा कृतीने इंटरनेटचं मन जिंकून घेतलं.

हजारो लोक मॉलमध्ये रोज जातात. पण एक आजी जेव्हा पहिल्यांदा गेल्या, तेव्हा त्यांनी असं काही केलं की सगळा मॉल थांबला. आजीच्या डोळ्यात जग पाहण्याची निरागसता आणि मनात स्वच्छतेबद्दलचा आदर… ती मॉलमध्ये आली आणि तिचं वागणं इतकं अनोखं ठरलं की लाखो लोकांच्या काळजाला भिडून गेलं. चमचमित फरशी पाहून त्या इतक्या भारावून गेल्या की पुढचा क्षण बघणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला…

नेमकं घडलं तरी काय?

आजी पहिल्यांदाच मॉलमध्ये गेल्या होत्या. शहरातल्या लोकांसाठी मॉलमध्ये जाणं ही रोजची गोष्ट असली, तरी अजूनही भारतात अशी कोट्यवधी लोकं आहेत, ज्यांचं जीवन शहरापासून खूप दूर, साधेपणात जातं. त्यांच्या आयुष्यात मॉलमध्ये फिरणं हे अजूनही स्वप्नच आहे. पण त्यांनी जे केलं… त्याने सोशल मीडियावर हजारो लोक भावूक झाले.

जेव्हा या आजी मॉलमध्ये गेल्या तेव्हा तिथला झगमगाट आणि स्वच्छ, चमचमित फरशा पाहून त्या एकदम थक्क झाल्या. एवढंच नाही, तर त्या फरशीवर चप्पल घालून चालणं योग्य वाटलं नाही म्हणून त्यांनी चक्क चप्पल हातात घेतली आणि अनवाणी पायाने मॉलमध्ये फिरायला लागल्या. आजूबाजूचे लोक आपापल्या गडद चपलांमध्ये मोकळेपणाने फिरत होते, पण या आजी मात्र एक वेगळीच अस्वस्थता आणि लाजिरवाणी भावना घेऊन त्या ठिकाणी चालताना दिसल्या आणि या एका कृतीमुळे त्या आजी इंटरनेटच्या लाडक्या ठरल्या.

या क्षणाचं व्हिडीओमध्ये अचूक टिपण करण्यात आलं आहे आणि लोकांना तो क्षण इतका भावला की हजारो लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोणी म्हणालं, “किती भोळ्या आणि गोड आहेत या आज्जी”, तर दुसर्‍या एकाने कमेंट करत म्हटलं, “चप्पल घसरू शकतात म्हणून काढल्या असतील… पण त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य खूप काही सांगून जातं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ केवळ एक दृश्य नाही, तर तो आपल्या समाजातल्या दोन जगांमधील फरक आणि अजूनही शहरी-संस्कृतीपासून दूर असलेल्या लोकांच्या साधेपणाचा आरसा आहे. आजींचं हे निरागस वागणं लाखो लोकांच्या हृदयाला भिडलं आहे.