Viral video: सोशल मीडियावर रोज किती तरी व्हिडीओ व्हायरल होत असतात.सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक गाण्यांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. काही व्हिडीओंना मोठ्या आवडीने शेअरही केले जाते. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. अशाच एका आजीबाईंचा जबरदस्त असा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय हा व्हिडीओ तुम्हीही पुन्हा पुन्हा पाहाल.

वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशी आजीबाई व्हायरल होतो आहे, जिने असं काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे तिच्या नातीही शॉक झाल्या आहेत. अनेक वयस्कर लोकांकडे पाहिल्यानंतर ‘वय हे फक्त आकडा असतात’ या वाक्याची आठवण होते. कारण काही वयस्कर लोक इतके फिट आणि उत्साही असतात की तरुणही लाजतील. आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.

तुम्हाला एक कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे.कार्यक्रमानिमित्ताने मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत.काही वेळात तिथे सर्वत्र गाणं सुरु होत.’ नवरी नटली, काल बाई सुपारी फुटली’हे गाणं असतं.त्यावर सर्व महिला डान्स करण्यास सुरुवात करतात.डान्स करत असताना अनेक महिलांमध्ये एक आजींकडे सर्वांचे लक्ष जाते.डान्स करताना आजी अतिशय उत्साही आणि आनंदी दिसत आहेत. अगदी डोक्यावरचा पदर खाली पडू न देता ही आजीबाई डान्स करत आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by SoftTadka (@softtadka)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

softtadka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “परफेक्ट जमलं” आणखी एकानं लिहलंय, “नाद खुळा”