अनेकदा दुकानात गेल्यानंतर आपण काही न घेता मनाप्रमाणे हिंडून किंवा किंमत विचारून परत येतो. या वस्तूची किंमत किती, त्याची किंमत किती, हे असे का आहे, ते तसे का विचारत दुकानदाराला त्रास देतात आणि काही न घेताच दुकानतून निघून जातो. त्याचवेळी दुकानदारासोबत तासंतास फालतू गप्पा मरत वेळ वाय घालवणारेही काही कमी नाहीत. पण आता दुकानदारांनाही याची सवय झाली आहे. पण परदेशात असं नसतं तिथले नियम आणि कायदे वेगळे असतात. असाच एक देश म्हणजे स्पेन. जिथे एका दुकानदाराने दुकानात शिरत काही न घेता परत जाणाऱ्या ग्राहकांसाठी कडक नियम तयार केला आहे. जो वाचून ग्राहकही त्या दुकानात जाताना १०० वेळी विचार करतील,
स्पेनच्या बार्सिलोनामध्ये क्विवियर्स मुरिया नावाचे एक किराणा मालाचे दुकान आहे. हे किराणा दुकान १८९८ पासून सुरू आहे, जे अतिशय सुशोभित केलेले आहे. या दुकानाची सजावट ग्राहकांना आकर्षित करते. त्यामुळे दरवर्षी मोठ्यासंख्येने पर्यटक हे दुकान पाहण्यासाठी येतात. यावेळी बहुतेकजण आतून दुकान पाहतात दुकानदाराला प्रश्न विचारून वेडं करतात आणि काही न घेता निघून जातात. तर काहीजण फक्त फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी येत असतात. यामुळे सगळ्या त्रासाला कंटाळून आता दुकानदाराने त्यावर एक उपाय शोधला आहे.
दुकानाच्या एंट्रीवर एक बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर लिहीले आहे की, जर तुम्हाला दुकान बघण्यासाठी आत यायचे असेल तर तुम्हाला ५ युरो (४६१ रुपये) द्यावे लागतील. हे फक्त अशा लोकांना लागू असेल, जे फक्त दुकान पाहण्यासाठी येतात आणि खरेदी न करता निघून जातात. मात्र या निर्णयामुळे पर्यटक भलतेच नाराज झाले आहेत.
या दुकानात पर्यटक येत असल्याने कामगारांची चांगलीच दमछाक होत असल्याचे सांगण्यात येतेय. पर्यटकांमुळे दुकानात गर्दी होते, अशा परिस्थितीत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे दुकानदारालाही नुकसान सहन करावे लागले. हे टाळण्यासाठी त्यांनी खरेदी न करणाऱ्यांना ४६१ चा दंड ठोठावला.