Viral video: सध्याच्या काळात प्रत्येक लग्नात एक वेगळीच धमाल दिसून येते. नवरा- नवरी असो वा त्यांच्या कुटुंबियातील प्रत्येक सदस्य सर्व असे फुल उत्साहात असतात. मग कधी लग्नातील डान्स करणे असो त्यात प्रत्येकजण आनंदाने सहभागी होत असतो, सध्या सोशल मीडियावर असाच एका नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यानं बायकोसमोर त्याच्या आईसोबत भन्नाट डान्स केला आहे. नवरदेवानं खानदेशी गाण्यावर ठेका धरत स्वत:चीच हळद गाजवली आहे. लग्नाचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. त्यात नवरा नवरीचे व्हिडीओ तर प्रचंड व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.

महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. त्यांची ठसकेबाज अहिराणी भाषा आपल्याला माहितीच आहे तसेच सोबतच खानदेशी गाणीही प्रचंड व्हायरल होतात. अशाच एका खानदेशी गाण्यावर नवरदेव बायकोसोबत नाहीतर चक्क आईसोबत हळदीत थिरकला आहे. “माडी बहु तुले येई जाई करमन लगन” या खानदेशी गाण्यावर नवरदेवाचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय. यावेळी नवरदेवासोबत नवरी आणि नवरदेवाच्या आईनंही ठेका धरत डान्स केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर chetan_suryavanshi_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अरे समोर तर बायको उभी आहे आता काय सांगतोस आईला” तर आणखी एकानं प्रतिक्रिया दिली आहे की, “माय नको सोडजो रे भो.”