आजकाल सोशल मीडियावर तुम्ही वधू-वरांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. यात काही मजेशीर व्हिडीओ देखील पाहिले असतील. असाच एक मजेशील व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हा व्हिडीओ एका लग्नाचा आहे, ज्यामध्ये वधू-वर स्टेजवर उभे आहेत आणि त्यांचे नातेवाईकही त्यांच्यासोबत उभे राहून नाचत आहेत. यादरम्यान स्टेजवर उभ्या असलेल्या नवरदेवाचे कृत्य पाहून सगळे हैराण झाले. या वराने लग्नात जे केले ते क्वचितच कोणत्या वराने केले असेल. वराच्या कृत्यानंतर वधूने जे केलं ते तुम्हाला व्हिडीओ पाहूनच कळेल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वरमाळा घालल्यानंतर वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत आणि खूप आनंदी दिसत आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक देखील त्यांच्याभोवती उभे आहेत आणि आनंदाने नाचत आहेत. तेवढ्यात दोन हजाराची नोट देखील स्टेजवर पडली आहे आणि वर तिथे बसून स्टेजवर पडलेली नोट उचलून चुपचाप खिशात ठेवतोय. त्यानंतर वराला चूप ठेवण्यासाठी वधू त्याच्या हातात एक नोट देते आणि हसायला लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही देखील कोणत्याही नवरदेवाला स्वतःच्याच लग्नात अशा प्रकारे पैसे उचलताना कधीच नसेल पाहिलं, हे मात्र नक्की. दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.