सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी आता लग्न सोहळ्यातील नवरा-नवरीचे व्हिडीओही दिवसेंदिवस व्हायरल होताना दिसत आहे. स्टेजवर भन्नाट डान्स करून लोकांचं मनोरंजन करण्याचं फॅड वाढत चाललं आहे. डीजेच्या तालावर ठुमके मारून रिल्स बनवण्याची आवडही जोपासली जात आहे. अशाच एका लग्नसोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवरा-नवरी सात फेरे घेण्यासाठी लग्न मंडपात बसलेली असताना नवऱ्याला क्रिकेट खेळायचा मोह आवरला नाही. नवऱ्याच्या फलंदाजीचा जबरदस्त अंदाज पाहून वऱ्हाडी मंडळींच्याही भुवया उंचावल्या असतील. हा भन्नाट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मंडपातूनच मारला क्रिकेटचा शॉट

वर्षा नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लग्नाचे विधी सुरु असताना नवरा-नवरी एकमेकांजवळ बसलेले असतात आणि त्याचदरम्यान त्यांचा मित्र खिल्ली उडवत असल्याचं या व्हिडीओता दिसत आहे. त्यावेळी पंडीत मंत्र वाचत असताना नवरा-नवरीला पाहून त्यांच्या एका मित्राने त्यांची खिल्ली उडवली. त्यांच्या मित्र एक फुल हातात घेऊन नवऱ्याच्या अंगावर मारण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर नवरदेव जबरदस्त स्टाईलने बॅटसारखा फटका मारत त्या फुलाला बाहेर फेकतो. लग्नमंडपात नवऱ्याच्या या क्रिकेट स्टाईलला पाहून सर्वच थक्क झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – चित्रात असलेली चुक तुम्हाला ओळखता आली का? १० सेकंदात ओळखण्याचे चॅलेंज स्विकारानेटकऱ्यांना बसला धक्का

इथे पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांना बसला धक्का

आपल्या मित्राने अंगावर फेकलेल्या फुलाला नवरदेव फलंदाजीच्या अंदाजात जबरस्त फटका मारून फुलाला मंडपाच्या बाहेर फेकतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नवऱ्याने फलंदाजीच्या शैलीत मारलेला शॉट पाहून काही नेटकऱ्यांनी त्याला क्रिकेट लव्हर म्हटलं आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ३ लाखांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण भन्नाट प्रतिक्रियाही देत आहेत.